मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ben Stokes : असा झेल फक्त बेन स्टोक्सच घेऊ शकतो, व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहाल!

Ben Stokes : असा झेल फक्त बेन स्टोक्सच घेऊ शकतो, व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहाल!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 04, 2024 01:03 PM IST

Ben Stokes Catch Video : इंग्लंडचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स हा एक अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे, यात शंका नाही. विशाखापट्टणम कसोटीत त्याने याचा नमुना दाखवला आहे.

ind vs eng test day 3
ind vs eng test day 3

India vs England 2nd Test Day 3, Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. आतापर्यंत या सामन्यात टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकामुळे (२०९ धावा) भारताने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा डाव २५३ धावांवर आटोपला.

आज (४ फेब्रुवारी) म्हणजेच सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ दुसरा डाव खेळत आहे. या डावात श्रेयस अय्यरने चांगली सुरुवात केली. मात्र त्याला या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. तो ५२ चेंडूत ५९ धावा करून झेलबाद झाला. बेन स्टोक्सने श्रेयसचा अप्रतिम झेल घेतला. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते या झेलचे प्रचंड कौतुक करत आहेत.

वास्तविक, डावखुरा फिरकी गोलंदाज टॉम हार्टले भारताच्या डावातील २८ वे षटक टाकत होता. तर श्रेयस अय्यर स्ट्राइकवर होता. हार्टलेच्या फ्लाइटेड चेंडूवर अय्यरने पुढे येऊन मोठा फटका खेळला. यानंतर चेंडू मिड-ऑफच्या वरून हवेत उंच सीमारेषेकडे जात होता. यानंतर मिडऑफवर उभा असलेला बेन स्टोक्स चेंडू पकडण्याासाठी धावला आणि चेंडूपर्यंत पोहोचल्यानंतर थरारक डाईव्ह मारला आणि अप्रतिम झेल घेतला. त्याच्या झेलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. श्रेयस अय्यर ५२ चेंडूत२ चौकारांच्या मदतीने २९ धावा करून बाद झाला.

तत्पूर्वी, या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदजी केली आणि सर्वबाद ३९६ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २५३ धावात गारद झाला आणि भारताला १५३ धावांची आघाडी मिळाली. आता भारताचा दुसरा डाव सुरू असून हे वृत्त लिहिपर्यंत शुभमन गिल अर्धशतक करून खेळत आहे.

WhatsApp channel