पाकिस्तानचा कर्णधार बेन स्टोक्सच्या घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. खुद्द इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधाराने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. स्टोक्सने सांगितले की, १७ ऑक्टोबर रोजी तो पाकिस्तान दौऱ्यावर असताना त्याच्या घरात चोरी झाली होती.
इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, तो पाकिस्तान दौऱ्यावर असताना त्याच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. चोरट्यांनी गुन्हा केला तेव्हा त्याची पत्नी व मुले घरी उपस्थित होती. इंग्लिश संघाच्या कर्णधाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
बेन स्टोक्सने सोशल मीडियावर लिहिले की, "१७ ऑक्टोबर रोजी, कॅसल इडन स्थित माझ्या घरात मास्क घातलेल्या काही घरात प्रवेश केला आणि घरातील वस्तू लंपास केल्या. त्यांनी दागिने, इतर वस्तू आणि काही वैयक्तिक वस्तूही चोरल्या, ज्या माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मी सर्व लोकांना आवाहन करतो की चोरी करणाऱ्यांना अटक करण्यात मदत करावी.”
बेन स्टोक्सने काही चोरलेल्या वस्तूंचे जुने फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये OBE (ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर) पदकाचाही समावेश आहे. ही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केल्याने आरोपींना अटक करण्यात मदत होईल, अशी आशा त्याला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
बेन स्टोक्सने पुढे लिहिले आहे की, "या गुन्ह्याची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे माझी पत्नी आणि दोन लहान मुले घरात उपस्थित असताना हा गुन्हा घडला. सुदैवाने माझ्या कुटुंबातील एकाही सदस्याला शारीरिक इजा झाली नाही. मात्र, साहजिकच या अनुभवामुळे त्याच्या भावनिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम झाला आहे. ही परिस्थिती किती वाईट असू शकली असती, याचाच आपण विचार करू शकतो. "
संबंधित बातम्या