मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा फलंदाज बेन डकेट याने झंझावाती शतक झळकावले आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड कसोटी सामन्याचा आज (१६ ऑक्टोबर) दुसरा दिवस आहे.
मुलतान कसोटीत पाकिस्तानी फलंदाज वेगाने धावा काढू शकले नाहीत. पाकिस्तानी संघ ३६६ धावांवर सर्वबाद झाला. यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी नेहमी प्रमाणे वेगाने सुरुवात केली. बेन डकेटने आपल्याच शैलीत खेळत पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि शतक झटपट पूर्ण केले.
बेन डकेटने कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक आहे. तर डकेटचे पाकिस्तानविरुद्धचे हे दुसरे शतक आहे. बेन डकेटने आशियामध्ये चारपैकी तीन शतके झळकावली आहेत, ही कोणत्याही इंग्लिश फलंदाजासाठी मोठी गोष्ट आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बेन डकेटने शतक झळकावून इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले. डकेटने शतक पूर्ण केले तेव्हा इंग्लंडची धावसंख्या २ बाद २९५ धावा होती. बेन डकेटने सुरुवातीपासूनच वेगवान फलंदाजी करत ४७ चेंडूत अर्धशतक ठोकले.
बेन डकेटच्या शतकापूर्वी एका अतिशय रंजक घटना घडली. वास्तविक, जेव्हा डकेट फलंदाजी करत होता, तेव्हा पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिझवानने त्याला क्रीझमधून बाहेर जाऊन खेळण्यास सांगत होता, जेणेकरुन तो त्याला स्टंम्पिंग बाद करू शकले. पण डकेटने त्याचे ऐकले नाही.
यानंतर बेन डकेटने पाकिस्तानच्या गोलंदाजीवर अधिक वेगाने आक्रमण करत शतक झळकावले. बेन डकेटने ११९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यानंतर डकेट जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. तो ११४ धावांवर साजिद खानच्या चेंडूवर आगा सलमानकरवी झेलबाद झाला.
बेन डकेटने आपल्या शतकी खेळीदरम्यान अप्रतिम कामगिरी केली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या. या खेळाडूने सर्वाधिक स्ट्राईक रेटने कसोटीत २००० धावा पूर्ण केल्या आहेत. डकेटचा कसोटीतील स्ट्राइक रेट ८७.१० आहे जो वीरेंद्र सेहवागपेक्षा जास्त आहे.
इतकेच नाही तर बेन डकेटने ८व्यांदा १०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फिफ्टी प्लस स्कोअर केला. या बाबतीत त्याने जो रूट आणि ब्रेंडन मॅक्युलमची बरोबरी केली. या बाबतीत सेहवाग पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने कसोटीमध्ये १७ वेळा १०० हून अधिकच्या स्ट्राइक रेटने अर्धशतक केले आहे.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुलतान येथे खेळला जात आहे. या सामन्यात कामरान गुलामच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने ३६६ धावा केल्या. बाबर आझमच्या जागी संघात आलेल्या कामरान गुलामने मंगळवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी ११८ धावांची खेळी केली. सामन्याचा पहिला दिवस कामरान गुलामच्या नावावर होता तर दुसरा दिवस बेन डकेटच्या नावावर होता.