मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Team India Salary : बीसीसीआय टीम इंडियाच्या खेळाडूंना करणार मालामाल! पगारवाढीसह बोनसही देणार

Team India Salary : बीसीसीआय टीम इंडियाच्या खेळाडूंना करणार मालामाल! पगारवाढीसह बोनसही देणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 27, 2024 11:22 AM IST

Team India Salary : भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या पगारात लवकरच वाढ होऊ शकते. कसोटी मालिका खेळणाऱ्या खेळाडूंना बोनस देण्याचाही बीसीसीआय विचार करत आहे.

Team India Salary
Team India Salary

भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू कसोटी आणि देशांतर्गत मालिकेऐवजी इंडियन प्रीमियर लीगला अधिक प्राधान्य देताना दिसत आहेत. ईशान किशन आणि श्रेयस अय्यरच्या प्रकरणानंतर याची प्रचंड चर्चा होत आहे.

याच कारणाने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) कसोटी फॉरमॅटला प्रोत्साहन देण्यासाठी मोठे पाऊल उचलू शकते. बीसीसीआय कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात वाढ करणार असल्याचे समोर आले आहे. यासोबतच सर्व मालिकांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना बोनसही मिळणार आहे.

एक वृत्तपत्राच्या बातमीनुसार, BCCI आयपीएल २०२४ नंतर कसोटी खेळाडूंच्या पगारात वाढ करू शकते. बीसीसीआय प्रत्येक कसोटी मालिकेत खेळणाऱ्या खेळाडूंना बोनसही देऊ शकते. मंडळाला एका महत्त्वाच्या कारणासाठी हा बदल करायचा आहे. आयपीएलमध्ये फिट राहण्यासाठी अनेक खेळाडू रणजी ट्रॉफी आणि देशांतर्गत सामन्यांतून माघार घेत आहेत. नुकताच इशान किशन याबाबत चर्चेत आला होता. 

बीसीसीआयच्या विनंतीनंतरही ईशानने झारखंडसाठी रणजी क्रिकेट खेळले नाही. श्रेयस अय्यरनेही रणजी ट्रॉफीचा उपांत्यपूर्व सामना खेळला नाही.

बीसीसीआय सध्या एका कसोटी सामन्यासाठी खेळाडूंना १५ लाख रुपये देते. २०१६ मध्ये त्यांचा पगार दुप्पट झाला होता. तर खेळाडूंना एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख रुपये मिळतात. टी-२० सामन्यासाठी खेळाडूंना ३ लाख रुपये मॅच फीस मिळते. टीम इंडियाच्या खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून त्यांच्या ग्रेडनुसार वार्षिक पगारही दिला जातो. 

आता आयपीएलनंतर खेळाडूंचा पगार वाढणार आहे. टीम इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. भारताने या मालिकेत ३-१ अशी अजेय आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने २८ धावांनी जिंकला होता. यानंतर भारताने सलग तीन सामने जिंकले.

IPL_Entry_Point