आयपीएल २०२४ मध्ये सोमवारी (८ एप्रिल) खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. या सामन्यात ६४ धावांची स्फोटक खेळी करणारा आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. त्याच्यासोबत विराट कोहलीनेही ६७ धावांची शानदार खेळी केली.
पण, या मोठ्या विजयानंतर कर्णधार पाटीदार याला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. बीसीसीआयने त्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान आरसीबीने स्लो ओव्हर-रेट राखल्यामुळे आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत, जो स्लो ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे, त्याच्या संघाचा हंगामातील हा पहिलाच गुन्हा होता, पाटीदारला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
आरसीबीला फिल साल्टच्या रूपाने पहिला धक्का बसला. यांतर विराट कोहली याने देवदत्त पडिक्कलसोबत ९१ धावांची भागीदारी केली, त्यानंतर रजत पाटीदारसोबत ४८ धावांची भागीदारी केली. ४२ चेंडूत ६७ धावा करून कोहली बाद झाला.
पण यानंतर कर्णधार पाटीदारने स्फोटक फलंदाजी केली. त्याने ३२ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या. या खेळीसाठी त्याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. आरसीबीने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी २२२ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. पण तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्या वादळी खेळीमुळे संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला.
मुंबईला विजयासाठी १२ चेंडूत २८ धावांची आवश्यकता होती, जोश हेझलवूडने १९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पंड्याची विकेट घेऊन सामना आरसीबीच्या दिशेने फिरवला. त्यानंतर, शेवटच्या षटकात, कृणाल पंड्याने १९ धावांचा बचाव केला आणि ३ बळी घेतले.
संबंधित बातम्या