आयपीएलचा संघ लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव फार कमी वेळात प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याने आपल्या वेगवान चेंडूने सर्वांना चकित केले. मयंकने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मयंक देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. मात्र त्याला अद्याप टीम इंडियात एंट्री मिळालेली नाही.
पण अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मयंक सध्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये असून तो स्वत:वर काम करत आहे.
एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार, जय शाह म्हणाले की, "मी सध्या मयंक यादववर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ शकत नाही." तो टीम इंडियात सामील होईल की नाही याची शाश्वती नाही. पण त्याच्यात खूप क्षमता आहे. तो खूप चांगला वेगवान गोलंदाज आहे आणि आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे".
मयंकने आयपीएल २०२४ मध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने ताशी १५० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली. मयंकने १५६.७ किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकला आहे. गेल्या मोसमातच मयंकने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. तो आतापर्यंत फक्त ४ आयपीएल सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये ७ विकेट्स घेतल्या आहेत. मयंकची सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे १४ धावांत ३ बळी आहे.
मयंकच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने लिस्ट ए चे १७ सामने खेळले आहेत. या कालावधीत ३४ विकेट्स घेतल्या आहेत. मयंकची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे ४७ धावांत ४ विकेट्स घेणे ही आहे. मयंकने एक प्रथम श्रेणी सामनाही खेळला आहे. त्याने १४ टी-20 सामन्यात १९ विकेट घेतल्या आहेत. जर मयंकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली तर त्याला लवकरच टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकते.