मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Jay Shah ICC Chairman : जय शाह यांची ताकद वाढणार, आयसीसीचे अध्यक्ष बनणार? निवडणूक कधी? जाणून घ्या

Jay Shah ICC Chairman : जय शाह यांची ताकद वाढणार, आयसीसीचे अध्यक्ष बनणार? निवडणूक कधी? जाणून घ्या

Jul 08, 2024 05:10 PM IST

जय शाह हे २०१९ मध्ये बीसीसीआयचे सचिव बनले, परंतु आता शाह हे आयसीसीचे अध्यक्ष बनू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

Jay Shah ICC Chairman : जय शाह यांची ताकद वाढणार, आयसीसीचे अध्यक्ष बनणार? निवडणूक कधी? जाणून घ्या
Jay Shah ICC Chairman : जय शाह यांची ताकद वाढणार, आयसीसीचे अध्यक्ष बनणार? निवडणूक कधी? जाणून घ्या (PTI)

 केंद्रिय ग्रहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह हे २०१९ पासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव आहेत. सध्या त्यांच्या हातात बरीच सत्ता आहे, पण आता जय शाह यांनी आयसीसी अध्यक्षपदासाठी अर्ज केल्यास त्यांची नवीन अध्यक्षपदी बिनविरोध निवड होऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.

पण जय शाह यांनी या संदर्भात अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय घेतला नसल्याचेही बोलले जात आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक होणार आहे. सध्या, न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहेत आणि ते दुसऱ्या टर्मसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

Cricbuzz नुसार, ICC जुलै महिन्यात कोलंबोमध्ये एक बैठक घेणार आहे, ज्यामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली जाऊ शकते. 

ट्रेंडिंग न्यूज

जय शाह यांनी अद्याप या विषयावर आपले मौन सोडले नसले तरी आयसीसीच्या काही कार्यपद्धतीवर ते खूश नसल्याचे वृत्त आहे. रिपोर्ट्सनुसार, वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये टी-20 विश्वचषक २०२४ आयोजित करण्याबद्दलही शाह खूश नव्हते. जर शहा यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज केला आणि निवडणूक जिंकली तर ते आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनतील.

तसेच, आयसीसी अध्यक्षांच्या कार्यकाळात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी एखादी व्यक्ती तीन वेळा अध्यक्ष होऊ शकत होती आणि प्रत्येक कार्यकाळ २ वर्षांसाठी होता. परंतु नवीन नियमांनुसार, एखादी व्यक्ती दोनदा अध्यक्ष होऊ शकते आणि प्रत्येक कार्यकाळ ३ वर्षांचा असेल. 

जय शाह चेअरमन झाले तर ते या पदावर ३ वर्षे राहतील आणि असे केल्यावर ते २०२८ मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष होण्यास पात्र असतील.

जय शाह यांनी २००९ मध्ये क्रिकेट प्रशासनात एंट्री घेतली होती. याआधी ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद सांभाळत होते. ते २०१५ मध्ये BCCI मध्ये सामील झाले आणि सप्टेंबर २०१९ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाले.

WhatsApp channel