Impact Player Rule : बीसीसीआयने अचानक घेतला मोठा निर्णय, एका झटक्यात इम्पॅक्ट प्लेयर नियम रद्द केला! वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Impact Player Rule : बीसीसीआयने अचानक घेतला मोठा निर्णय, एका झटक्यात इम्पॅक्ट प्लेयर नियम रद्द केला! वाचा

Impact Player Rule : बीसीसीआयने अचानक घेतला मोठा निर्णय, एका झटक्यात इम्पॅक्ट प्लेयर नियम रद्द केला! वाचा

Published Oct 14, 2024 10:09 PM IST

BCCI scraps Impact Player Rule : बीसीसीआयने राज्य क्रिकेट संघटनांना पाठवलेल्या नोटीसमध्ये लिहिले आहे की, " बीसीसीआयने चालू देशांतर्गत हंगामातील इम्पॅक्ट प्लेयर नियम काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे."

Impact Player Rule : बीसीसीआयने अचानक घेतला मोठा निर्णय, एका झटक्यात इम्पॅक्ट प्लेयर नियम रद्द केला! वाचा
Impact Player Rule : बीसीसीआयने अचानक घेतला मोठा निर्णय, एका झटक्यात इम्पॅक्ट प्लेयर नियम रद्द केला! वाचा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इम्पॅक्ट प्लेअर नियम रद्द करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू होणार नाही, अशी नोटीस सर्व राज्यांच्या क्रिकेट संघटनांना पाठवण्यात आली आहे.

परंतु इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामात म्हणजेच आयपीएल २०२५ मध्ये त्याच्या वापरावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही.

बीसीसीआयने राज्य क्रिकेट संघटनांना पाठवलेल्या नोटीसमध्ये लिहिले आहे की, "कृपया लक्षात घ्या की बीसीसीआयने चालू देशांतर्गत हंगामातील इम्पॅक्ट प्लेयर नियम काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे." 

इम्पॅक्ट प्लेयर नियम सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये प्रयोग म्हणून आणण्यात आला होता. त्यानंतर आयपीएलमध्येही त्याची अंमलबजावणी झाली. आयपीएलच्या गेल्या हंगामात, रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या अव्वल खेळाडूंनी इम्पॅक्ट प्लेयर नियमाला आपला विरोध केला आहे.

गेल्या मोसमात मोहम्मद सिराज म्हणाला होता की, हा नियम लागू केल्याने आयपीएलमध्ये गोलंदाजांसाठी काहीच उरले नाही. हा नियम अष्टपैलू खेळाडूंची कारकीर्द बरबाद करण्याचे कारण ठरला आहे, अशा टीकेलाही सामोरे जावे लागले होते.

दरम्यान, या सर्व गोष्टी होऊनही, बहुतेक आयपीएल संघ मालक आणि प्रसारकांचे म्हणणे होते की हा नियम लागू झाल्यामुळे स्पर्धा अधिक रोमांचक आणि स्पर्धात्मक बनली आहे.

बरं, आता भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधून इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाकण्यात आला आहे, परंतु आयपीएल २०२५ नंतरही हा नियम लीगमध्ये कायम राहणार का हे पाहणे मनोरंजक ठरेल.

सध्या आयपीएलच्या पुढच्या मोसमापासून इम्पॅक्ट प्लेअरचा नियम रद्द केला जाणार नाही हे निश्चित. याशिवाय सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर नजर टाकल्यास, बीसीसीआयने देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्ये एका षटकात २ बाऊन्सर चेंडूंचा नियम पुन्हा लागू केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या