BCCI: भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलच्या सतराव्या हंगामातील दोन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने याबाबत माहिती दिली. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाणार होता, जो आता एक दिवस आधी म्हणजेच १६ एप्रिलला होणार आहे. तर, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात १६ एप्रिल रोजी खेळला जाणारा सामना १७ एप्रिल रोजी पाहायला मिळेल.
कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील सामना मनवमीच्या मुहूर्तावर असल्याने आणि निवडणुकीसाठी आधीच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत. यामुळे येत्या १७ एप्रिलला होणाऱ्या सामन्यासाठी पुरेशी सुरक्षा पुरवणे आम्हाला शक्य होणार नाही, असे कोलकाता पोलिसांनी क्रिकेट बोर्डाला लिहिलेल्या पत्रात नमूद केले.
आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत १४ सामने खेळले गेले आहेत. तर, बंगळुरू आणि लखनौ यांच्यात आज पंधरावा सामना खेळला जाणार आहे. आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत राजस्थानचा संघ ६ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर कोलकाता दुसऱ्या स्थानावर आहे. कोलकात्याचे ४ गुण आहेत. तीन पैकी दोन सामने जिकलेला चेन्नईचा संघ २ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, गुजरातचा संघ ४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा संघ गुणतालिकेत २ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.
संबंधित बातम्या