Gautam Gambhir : बीसीसीआयचा गौतम गंभीरला झटका! क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून सुचवलेल्या पहिल्याच नावावर मारली फुली
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Gautam Gambhir : बीसीसीआयचा गौतम गंभीरला झटका! क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून सुचवलेल्या पहिल्याच नावावर मारली फुली

Gautam Gambhir : बीसीसीआयचा गौतम गंभीरला झटका! क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून सुचवलेल्या पहिल्याच नावावर मारली फुली

Updated Jul 12, 2024 01:06 PM IST

bcci rejects jonty rhodes name for fielding coach : बीसीसीआयने देखील भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून जॉन्टी रोड्सचे सुचवलेले नाव नाकारले आहे.

बीसीसीआयचा गौतम गंभीरला झटका! क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी जॉन्टी रोड्सच्या नावावर मारली फुली
बीसीसीआयचा गौतम गंभीरला झटका! क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी जॉन्टी रोड्सच्या नावावर मारली फुली (PTI)

bcci rejects jonty rhodes name for fielding coach : बीसीसीआयने गौतम गंभीरची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नुकतीच नियुक्ती केली आहे. त्यानंतर आता सर्व लक्ष सपोर्ट स्टाफवर राहणार आहे. पुढील ५ वर्षांसाठी गंभीरचे फलंदाज, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी प्रशिक्षक कोण राहील याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान गंभीरने क्षेत्ररक्षणासाठी जॉन्टी रोड्सचे नाव सुचवले होते. मात्र, बीसीसीआयने याला नकार देत गौतम गंभीरल झटका दिला आहे. राहुल द्रविड कोच असतांना भारतीय फलंदाजी प्रशिक्षक म्हणून विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप होते. या सर्वांचा कार्यकाळही टी-२० विश्वचषकाने संपला. अशा परिस्थितीत टीम इंडिया नवीन सपोर्ट स्टाफच्या शोधात आहे.

प्रामुख्याने बीसीसीआय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाला स्वत:चा सपोर्ट स्टाफ निवडण्याचे स्वातंत्र्य देत असतं. गौतम गंभीरला देखील त्याचा सपोर्ट स्टाफ निवडण्याची मुभा दिली जाणार आहे. पण गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून माजी भारतीय सलामीवीर व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची पहिली पसंती बोर्डाने नाकारली आहे. गंभीरने माजी भारतीय वेगवान गोलंदाज आर विनय कुमारला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात यावे यासाठी शिफारस केली होती. मात्र, बीसीसीआयए विनय कुमारच्या नावाबाबत स्वारस्य दाखवले नाही. त्यानंतर आता बोर्डाने गंभीरची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून जॉन्टी रोड्सची निवडही नाकारली आहे. रोड्सच्या गुणवत्तेबद्दल शंका नाही.

आजही त्याची गणना जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज आयपीएलमधील विविध संघांशी सध्या तो प्रशिक्षक म्हणून जोडला आहे. त्याने लखनऊ सुपर जायंट्समध्ये गंभीरसोबत काम केले आहे. पण बीसीसीआय सपोर्ट स्टाफमध्ये कोणत्याही परदेशी खेळाडूची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यास उत्सुक नाही. गेल्या सात वर्षांपासून, भारत संपूर्णपणे स्वदेशी सपोर्ट स्टाफसोबत काम करत आहे. आणि बीसीसीआयला यात कोणताही बदल करायचचा नाही.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार जॉन्टी रोड्सच्या नावावर चर्चा झाली. गंभीरने त्याचे नाव सुचवले. मात्र, बोर्डाने भारतीय सपोर्ट स्टाफलाच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. अशा परिस्थितीत टी दिलीप यांच्या साठी आता पुन्हा दरवाजे उघडले आहेत. दिलीप त्यांनी त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघासोबत उल्लेखनिय काम केले आहे. मागील कोचिंग स्टाफमधील दिलीप यांना सध्याच्या टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासोबत राहणे देखील असामान्य नाही. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर राठोड संजय बांगरच्या जागी रवी शास्त्रीच्या प्रशिक्षक संघात सामील झाले आणि द्रविडच्या कार्यकाळात देखील ते कायम राहिले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या