मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni: धोनी होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक? कोहलीच्या जवळच्या व्यक्तीचं स्टेटमेंट समोर!

MS Dhoni: धोनी होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक? कोहलीच्या जवळच्या व्यक्तीचं स्टेटमेंट समोर!

May 28, 2024 01:31 PM IST

BCCI: भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून महेंद्रसिंग धोनीची निवड चांगली आहे, असे मत विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केले आहे.

टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण बनणार, याकडे संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागले आहे.
टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण बनणार, याकडे संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागले आहे. (ANI)

Team India New Head Coach: भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची अधिकृत मुदत २७ मे २०२४ रोजी संपली. यासाठी कोणत्याही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूशी संपर्क साधण्यात आलेला नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले असून अर्ज केलेल्या नावांबाबत त्यांनी मौन बाळगले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या शेवटच्या वक्तव्याच्या ओळी वाचल्या तर राहुल द्रविडची जागा भारतीय असण्याची शक्यता आहे. भारताचा स्टार फलंदाज गौतम गंभीरच्या खांद्यावर भारतीय मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. परंतु, विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी वेगळेच नाव सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

“द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक महान क्रिकेटपटू एमएस धोनीच्या नावाने पुढे आले. सर्वप्रथम या पदासाठी कोणती नावे अर्ज करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जो कोणी प्रशिक्षक बनेल तो भारतीय असावा, अशी माझी इच्छा आहे. जर महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीची घोषणा केली तर तो एक चांगला पर्याय ठरू शकतो. धोनीने खूप क्रिकेट खेळले आहे आणि मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत,”असे राजकुमार शर्मा यांनी इंडिया न्यूजच्या क्रिकिट प्रिडिक्टा या कार्यक्रमात सांगितले.

धोनीने आयपीएल निवृत्तीची अधिकृत घोषणा केलेली नाही. आयपीएल २०२४ हा भारताचा माजी कर्णधार धोनीसाठीा शेवटचा सामना मानला जात होता. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी धोनीने आणखी एक हंगाम चेन्नईच्या संघाचे प्रतिनिधित्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

राजकुमार शर्मा म्हणाले की, "धोनी दोन विश्वचषक विजेतेपद जिंकणारा यशस्वी कर्णधार आहे. जेव्हा त्याने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा भारतीय संघाने आपली नवी ओळख निर्माण केली. धोनीने अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळल्या. संघाचे नियोजन करणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही संघात सर्वात महत्त्वाचे असते. धोनी कर्णधार झाला तेव्हा त्या संघात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, हरभजन सिंह, अनिल कुंबळे, गौतम गंभीर आणि युवराज सिंह असे मोठे खेळाडू उपस्थित होते. असे असतानाही धोनीने संघाला उत्तम प्रकारे हाताळले," असे शर्मा म्हणाला.

धोनीने युएईमध्ये २०२१ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघासोबत मार्गदर्शक म्हणून काम केले होते. भारताचा माजी वेगवान गोलंदाज अतुल वासन याने टी-२० क्रिकेटमधील प्रशिक्षकाच्या भूमिकेबाबत वेगळा दृष्टिकोन मांडला. टी-२० क्रिकेटमध्ये प्रशिक्षकाचे पद काढून त्याच्या जागी मार्गदर्शक ठेवला पाहिजे आणि फॉरमॅट तज्ज्ञ ठेवला पाहिजे, असे मला वाटते.

ज्याप्रमाणे एबी डिव्हिलियर्स हा टी-२० क्रिकेटचा स्पेशालिस्ट आहे. वेस्ट इंडिज संघाने १९७९ ते १९८९ या काळात जागतिक क्रिकेटवर राज्य केले. हे आपल्या प्रशिक्षकामुळे आहे का? १९८३ आणि २००७ चा विश्वचषक भारताने आपल्या प्रशिक्षकामुळे जिंकला. माझ्या मते प्रशिक्षकाचे काम संघाला मैदानातून हॉटेलमध्ये नेण्यापुरतेच मर्यादित असते. संघाच्या पराभवाची जबाबदारी मी प्रशिक्षकाला देणार नाही आणि संघाच्या विजयाचे श्रेयही देणार नाही. फुटबॉलमध्ये जसे मॅनेजर असतात, प्रशिक्षक नसतात. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्येही प्रशिक्षकाऐवजी संघ सांभाळणारा मॅनेजर असायला हवा. द्रविडचा भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा करार टी-२० विश्वचषकानंतर या वर्षी संपणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४