Watch : वर्षाच्या शेवटी BCCI नं शेअर केला खास व्हिडीओ, पाहा टीम इंडियाचे सोनेरी क्षण-bcci new video about indian cricket team journey in 2023 bcci share video on social media ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Watch : वर्षाच्या शेवटी BCCI नं शेअर केला खास व्हिडीओ, पाहा टीम इंडियाचे सोनेरी क्षण

Watch : वर्षाच्या शेवटी BCCI नं शेअर केला खास व्हिडीओ, पाहा टीम इंडियाचे सोनेरी क्षण

Dec 31, 2023 10:47 PM IST

indian cricket team journey in 2023 : २०२३ या वर्षाला निरोप देताना बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे.

BCCI Video On Indian Cricket Team
BCCI Video On Indian Cricket Team (PTI)

BCCI Video On Indian Cricket Team : भारतीय क्रिकेट संघासाठी हे वर्ष (२०२३) चढ-उतारांनी भरलेले होते. भारताने या वर्षात दोन आयसीसी स्पर्धांची फायनल खेळली , पण भारताला दोन्ही वेळा पराभवाचे तोंड पाहावे लागले. भारताला WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभूत केले. त्यानंतर २०२३ च्या वनडे वर्ल्डकप फायनलमध्येदेखील ऑस्ट्रेलियानेच भारताचा धुव्वा उडवला.

पण या आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणे हीदेखील खूप मोठी गोष्ट आहे. भारताने या वर्षात दोनदा आयसीसी स्पर्धेची फायनल गाठली.

दरम्यान, २०२३ या वर्षाला निरोप देताना बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे.

तसेच भारतीय क्रिकेट संघाशी संबंधित अविस्मरणीय क्षण दाखवण्यात आले आहेत. टीम इंडियाने या वर्षाची सुरुवात श्रीलंकेिवरुद्धच्या मालिकेने केली. या T20 मालिकेत भारतीय संघाने श्रीलंकेचा २-१ असा पराभव केला. यानंतर भारताच्या महिला अंडर-19 संघाने टी-20 विश्वचषक जिंकला.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

BCCI चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोबतच चाहत्यांना बीसीसीआयचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या वर्षी वनडेचा आशिया कप जिंकला. यानंतर भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषकात सलग १० सामने जिंकले, पण त्यांचा अंतिम सामन्यात पराभव झाला.

अशा प्रकारे भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिला. मात्र विश्वचषक विजेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला.

ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून सहाव्यांदा वनडे विश्वचषक जिंकला. त्याचवेळी, भारतीय संघ तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक चॅम्पियन होण्यास मुकला. पण वर्षभरात भारतीय क्रिकेट संघाची यंदाची कामगिरी उत्कृष्ट राहिली. टीम इंडिया याचवर्षी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वनवरदेखील आली होती.