भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. याशिवाय टीम इंडियाचा युवा फलंदाज सर्फराज खान आणि माजी दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन यांचाही गौरव करण्यात आला आहे.
अश्विनला बीसीसीआयने विशेष पुरस्कार प्रदान केला. तर सरफराज खान याला त्याच्या शानदार आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी पुरस्कार देण्यात आला.
दिग्गज सचिन तेंडुलकर याला बीसीसीआयकडून 'कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. दिग्गज सचिन तेंडुलकरने भारतासाठी २०० कसोटी, ४६३ एकदिवसीय आणि १ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. सचिनने कसोटीत १५९२१ धावा, एकदिवसीय सामन्यात १८४२६ धावा आणि एकमेव T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात १० धावा केल्या. याशिवाय गोलंदाजी करताना त्याने कसोटीत ४६ आणि एकदिवसीय सामन्यात १५४ बळी घेतले.
टीम इंडियाचा माजी दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला बीसीसीआयने ‘बीसीसीआय स्पेशल अवॉर्ड’ प्रदान केला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मध्यावर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. भारतीय फिरकीपटूने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०६ कसोटी, ११६ एकदिवसीय आणि ६५ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज सर्फराज खानला बीसीसीआयकडून 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण' पुरस्कार देण्यात आला. उल्लेखनीय आहे की सरफराज खानने फेब्रुवारी २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
सफराज खानने कारकिर्दीतील पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात अनुक्रमे ६२ आणि ६८* धावा केल्या होत्या. सरफराजने टीम इंडियासाठी आतापर्यंत ६ कसोटी खेळल्या आहेत, ज्यामध्ये त्याने ३७.१० च्या सरासरीने ३७१ धावा केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटमधून १ शतक आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत.
संबंधित बातम्या