BCCI: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभव बीसीसीआयच्या जिव्हारी; खेळाडू- प्रशिक्षकांविरोधात कठोर पावले उचलणार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  BCCI: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभव बीसीसीआयच्या जिव्हारी; खेळाडू- प्रशिक्षकांविरोधात कठोर पावले उचलणार

BCCI: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभव बीसीसीआयच्या जिव्हारी; खेळाडू- प्रशिक्षकांविरोधात कठोर पावले उचलणार

Jan 14, 2025 12:45 PM IST

BCCI Issues Strict New Rules For Cricketers: ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर बीसीसीआय टीम इंडियातील खेळाडू आणि प्रशिक्षकांना कठोरता दाखवणार असून कडक निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभव बीसीसीआयच्या जिव्हारी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभव बीसीसीआयच्या जिव्हारी (AFP)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आपल्या खेळाडूंवर सर्व प्रकारचे निर्बंध घालण्याचा विचार करत आहे. विचारात घेतलेले काही नियम कालबाह्य आहेत. उदाहरणार्थ, मोठ्या मालिका किंवा स्पर्धांदरम्यान पत्नी किंवा कुटुंबीय क्रिकेटपटूंसोबत राहणार नाहीत. हा नियम बीसीसीआयने कोविड- १९ पूर्वी लागू केला होता. परंतु, नंतर तो काढून टाकण्यात आला. 

इंग्लंडविरुद्ध जवळपास दोन महिने चालणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआय काही नवे आणि जुने नियम लागू करू शकते. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, खेळाडूंसाठी सर्वात मोठे निर्बंध म्हणजे ते ४५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या स्पर्धा किंवा मालिकेदरम्यान आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवू शकत नाहीत. पत्नी किंवा कुटुंबीय जास्तीत जास्त दोन आठवडे खेळाडूंसोबत राहू शकतात. टूर किंवा इव्हेंट छोटा असेल तर कुटुंब आणि जोडीदार एकाच हॉटेलमध्ये सात दिवसांपेक्षा जास्त थांबणार नाहीत.

याशिवाय, आता सर्व खेळाडू टीम बसमधून प्रवास करतील, असे बोर्डाने सर्वांना स्पष्ट केले आहे. यामुळे संघात एकजूट येईल. कोणताही मोठा खेळाडू वेगळा प्रवास करणार नाही. टीमच्या प्रमुखाच्या पर्सनल मॅनेजरला टीम बस किंवा टीमच्या मागे धावणाऱ्या बसमध्ये प्रवास करता येणार नाही आणि त्याला व्हीआयपी बॉक्सची सुविधाही दिली जाणार नाही. याचबरोबर विमानात १५० किलोपेक्षा जास्त सामान घेऊन गेल्यास त्याची किंमत त्यांना स्वत: मोजावी लागेल, यावरही बंदी घालण्यात आली आहे.

बीसीसीआयचे निर्बंध

  • जर स्पर्धा किंवा मालिका 45 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ चालली तर कुटुंबाला केवळ 14 दिवस खेळाडूंसोबत राहण्याची परवानगी असेल. संपूर्ण स्पर्धा किंवा मालिकेदरम्यान पत्नीही खेळाडूंसोबत राहणार नाहीत.
  • जर दौरा 45 दिवस किंवा त्यापेक्षा कमी असेल तर केवळ 7 दिवस खेळाडूला त्याच्या कुटुंबासोबत ठेवू शकतात.
  • सर्व खेळाडूंना टीम बसमधून प्रवास करावा लागेल.
  • मुख्य प्रशिक्षकाचे पर्सनल मॅनेजर टीम बसमध्ये प्रवास करणार नाहीत. व्हीआयपी बॉक्सलाही परवानगी नाही.
  • जर खेळाडूंचे सामान १५० किलोपेक्षा जास्त असेल तर बीसीसीआय अतिरिक्त बॅगेज फी देणार नाही.

 

आता टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी

ऑस्ट्रेलियाविरोधातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ येत्या २२ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. नुकतीच बीसीसीआयने इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. या मालिकेतून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी पुनरागमन करणार आहे.

इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग