विराट-रोहितसह सीनियर खेळाडूंची हकालपट्टी होणार? BGT नंतर टीम इंडियात नवे शिलेदार दिसणार!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  विराट-रोहितसह सीनियर खेळाडूंची हकालपट्टी होणार? BGT नंतर टीम इंडियात नवे शिलेदार दिसणार!

विराट-रोहितसह सीनियर खेळाडूंची हकालपट्टी होणार? BGT नंतर टीम इंडियात नवे शिलेदार दिसणार!

HT Marathi Desk HT Marathi
Nov 03, 2024 09:07 PM IST

न्यूझीलंडविरुद्ध 0-3 व्हाईटवॉशनंतर बीसीसीआय ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर अनुभवी खेळाडूंच्या कारकीर्दीचा आढावा घेणार आहे. रोहित, कोहली, जडेजा आणि अश्विन यांच्यासाठी ही महत्वपूर्ण मालिका असू शकते.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियात नवे खेळाडू दिसणार, विराट-रोहितसह सीनियर खेळाडंची हकालपट्टी होणार?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियात नवे खेळाडू दिसणार, विराट-रोहितसह सीनियर खेळाडंची हकालपट्टी होणार?

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला व्हाईटवॉश मिळाला. आता या व्हाईटवॉशचे मूल्यमापन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) करणार आहे. तसेच, आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर या फॉरमॅटमधील काही दिग्गज खेळाडूंची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पुढील चक्र सुरू होण्यापूर्वी टप्प्याटप्प्याने सीनियर खेळाडूंना टीमच्या बाहेरचा मार्ग दाखवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांपैकी किमान दोन खेळाडूंचा ऑस्ट्रेलिया दौरा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय दौरा असू शकतो. हे चारही खेळाडू आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत.

रोहितला भारताच्या कसोटी भवितव्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, "बघा, मला वाटत नाही की आपण इतका पुढचा विचार करू शकतो. पुढील मालिकेवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे, ते म्हणजे ऑस्ट्रेलिया. 

"मी ऑस्ट्रेलिया मालिकेच्या पलीकडे पाहत नाही. ऑस्ट्रेलियाची मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पुढे काय होईल याचा विचार करण्यापेक्षा आपण त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू. 

बीसीसीआयचे दिग्गज आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात संघाच्या प्रगतीबाबत सीनियर खेळाडूंशी अनौपचारिक चर्चा होऊ शकते.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, "निश्चितपणे भारताच्या सीनियर खेळाडूंचे मूल्यांकन केले जाईल.  टीम इंडिया १० नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या हा मोठा पराभव आहे, पण ऑस्ट्रेलिया मालिका जवळ आली आहे आणि संघाची घोषणा आधीच झाली आहे, त्यामुळे सध्या या संघासोबत कोणतीही छेडछाड होणार नाही.

इंग्लंडमध्ये होणाऱ्या WTC फायनलसाठी भारत पात्र ठरला नाही, तर इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत या चारपैकी काही नावे नसण्याची दाट शक्यता आहे. या चौघांनी घरच्या मैदानावर बहुधा आपला शेवटचा कसोटी सामना एकत्र खेळला आहे. 

इंग्लंड मालिकेत नवे खेळाडू दिसतील

टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब झाली आहे. अशा स्थितीत निवड समिती मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गंभीर यांनी या योजनेबद्दल दिग्गज क्रिकेटपटूंशी बोलणे आवश्यक आहे. 

भारतीय संघ अजूनही डब्ल्यूटीसी फायनलसाठी पात्र होण्याच्या शर्यतीत आहे. जर संघ WTC फायनलमधून बाहेर पडली. तर पुढील WTC चक्र सुरू होण्यापूर्वी, सिनीयर खेळाडू संघातून गायब होऊ शकतात. पुढील WTC सायकल भारताच्या इंग्लंड दौऱ्यापासून सुरू होईल. या दौऱ्यात भारत ५ कसोटी सामने खेळेल. ही मालिका २० जूनपासून होणार आहे. अशा स्थितीत या मालिकेत साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल यांच्यासारख्या खेळाडूंना संधी मिळू शकते.

जडेजा अश्विनचा पर्याय म्हणून वॉशिंग्टन सुंदर तयार

वॉशिंग्टन सुंदर पुढील १० वर्षांसाठी प्रबळ दावेदार म्हणून उदयास येत असल्याने ऑस्ट्रेलिया मालिका संपल्यानंतर अश्विनच्या भारतातील भवितव्याची चर्चा होऊ शकते. उत्तम फिटनेस असलेल्या आणि परदेशी खेळपट्ट्यांवर चांगली फलंदाजी करणाऱ्या जडेजाला कायम ठेवले जाऊ शकते, मात्र अक्षर पटेलच्या रूपाने त्याचा दमदार पर्याय भारतीय परिस्थितीत तयार आहे. मानव सुथारही या बाबतीत वेगाने पुढे येत आहे. रोहितने फेब्रुवारी २०२१ पासून ३५ कसोटी डावात ३७.१८ च्या सरासरीने १२१० धावा केल्या आहेत. गेल्या १० डावांमध्ये त्याला केवळ दोन अर्धशतके झळकावता आली असून त्याने ६ डावांत १० पेक्षा कमी धावा केल्या आहेत. 

विराट कोहलीची कामगिरीदेखील खूपच खराब राहिली आहे. त्याने गेल्या २५ डावात ३०.९१ च्या सरासरीने ७४२ धावा केल्या आहेत. रोहितने या काळात चार शतके झळकावली आहेत, तर कोहलीने केवळ १ शतक केले आहे आणि तेही अहमदाबादच्या सपाट खेळपट्टीवर. जसप्रीत बुमराहला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे, पण त्याचे वर्कलोड मॅनेजमेंट पाहता ते फार काळ ताणता येणार नाही. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्यापैकी एकाकडे कसोटी संघाची धुरा सोपवली जाऊ शकते.

Whats_app_banner