Team India Contract : तुषार देशपांडे-मयंक यादवला लॉटरी, ७ गोलंदाजांना मिळाला बीसीसीयचा करार, वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Team India Contract : तुषार देशपांडे-मयंक यादवला लॉटरी, ७ गोलंदाजांना मिळाला बीसीसीयचा करार, वाचा

Team India Contract : तुषार देशपांडे-मयंक यादवला लॉटरी, ७ गोलंदाजांना मिळाला बीसीसीयचा करार, वाचा

Updated Jun 27, 2024 04:45 PM IST

Team India Central Contract : बीसीसीआयने वेगवान गोलंदाजीच्या करारात ७ नवीन गोलंदाजांचा समावेश केला आहे. या गोलंदाजांनी आयपीएल तसेच देशांतर्गत सामन्यांमध्येही चांगली कामगिरी केली आहे.

Team India Contract : तुषार देशपांडे-मयंक यादवला लॉटरी, ७ गोलंदाजांना मिळाला बीसीसीयचा करार, वाचा
Team India Contract : तुषार देशपांडे-मयंक यादवला लॉटरी, ७ गोलंदाजांना मिळाला बीसीसीयचा करार, वाचा

टीम इंडिया ६ जुलैपासून झिम्बाब्वेविरुद्ध ५ सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी भारताने अनेक नवीन खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेलाही आयपीएलमध्ये संघात स्थान मिळाले आहे. संघात स्थान मिळण्यासोबतच तुषारचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केंद्रीय करारात समावेश केला आहे. 

देशपांडेसह ७ गोलंदाजांना बीसीसीआयचा करार देण्यात आला आहे. या यादीत लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवचाही समावेश आहे.

तुषार देशपांडेने देशांतर्गत सामन्यांबरोबरच आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. तो मुंबईकडून देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळतो. तुषार भारत अ संघाकडूनही खेळला आहे. त्याने इंग्लंड अ संघाविरुद्ध १५ विकेट घेतल्या.

यासोबतच त्याचा मुंबईकडून खेळतानाचा रणजी हंगामही उत्कृष्ट होता. तुषारची दमदार कामगिरी पाहून त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला. यासोबतच वेगवान गोलंदाजीचा करारही देण्यात आला.

तुषारसोबत मयंक यादवलाही वेगवान गोलंदाजीचा करार मिळाला आहे. आकाश दीप, विजय कुमार वैशाक, उमरान मलिक, यश दयाल, विद्वत कवरेप्पा यांचाही या यादीत समावेश आहे. 

मयंकच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने १७ लिस्ट ए सामन्यात ३४ विकेट घेतल्या आहेत. यासह त्याने १४ टी-20 सामन्यात १९ विकेट घेतल्या आहेत. मयंकने एक प्रथम श्रेणी सामनाही खेळला आहे.

भारत-झिम्बाब्वे टी-20 मालिकेचे वेळापत्रक

टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप २०२४  नंतर ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ६ जुलै रोजी होणार आहे. यानंतर दुसरा सामना ७ जुलै रोजी होणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा टी-20 सामना १० जुलै रोजी होणार आहे. संघाचा चौथा सामना १३ जुलै रोजी होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना १४ जुलै रोजी होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या