Team India Diamond Ring : टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात २०२४ चा टी-20 वर्ल्डकप जिंकला. टीम इंडियाच्या या विजयानंतर संघाची मुंबईत विजयी परेडही काढण्यात आली होती. यावेळी मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली होती.
यानंतर आता एका अवॉर्ड शोमध्ये टी-20 वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकतेच नमन पुरस्कारांचे आयोजन केले होते. यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंना हिऱ्याच्या अंगठ्या भेट देण्यात आल्या.
बीसीसीआयने शुक्रवारी (७ फेब्रुवारी) संध्याकाळी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये खेळाडूंना देण्यात आलेली डायमंड रिंग दाखवण्यात आली आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना बीसीसीआयने लिहिले की, "टीम इंडियाचा सन्मान करण्यासाठी त्यांना चॅम्पियन रिंग देण्यात आली." बीसीसीआयने या पोस्टमध्ये सांगितले की ही अंगठी हिऱ्याची आहे.
या रिंगची सर्वात मोठी आणि पहिली खासियत म्हणजे ती चॅम्पियन्सची रिंग आहे. यासोबतच या रिंगची रचना एका खास पद्धतीने करण्यात आली आहे. अंगठीवर प्रत्येक खेळाडूचे नाव लिहिलेले आहे. रोहित शर्माला जी अंगठी मिळाली आहे त्यावर त्याचे नाव लिहिले आहे. यासोबतच खेळाडूंच्या धावाही त्या रिंगवर अंकित करण्यात आल्या आहेत.
टीम इंडियाच्या खेळाडूंना मिळालेली हिऱ्याची अंगठी खूप महाग आहे. ती हिऱ्यापासून बनलेली आहे. दुसरे कारण म्हणजे रिंगची रचना अतिशय खास पद्धतीने करण्यात आली आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला त्याचे नाव असलेली रिंग देण्यात आली.
दरम्यान, या अंगठीच्या खऱ्या किमतीबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण या हिऱ्याच्या अंगठीची किंमत लाखोंच्या घरात असू शकते.
संबंधित बातम्या