मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  BCCI Awards 2024 : शुभमन गिल ते सरफराज खान… कोणाला कोणता पुरस्कार? पाहा संपूर्ण यादी

BCCI Awards 2024 : शुभमन गिल ते सरफराज खान… कोणाला कोणता पुरस्कार? पाहा संपूर्ण यादी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 23, 2024 08:11 PM IST

BCCI Awards 2024 : बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कारांचे आज हैदराबादमध्ये वितरण करण्यात आले. यामध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासह अनेक खेळाडूंना पुरस्कार मिळाले.

BCCI Awards 2024
BCCI Awards 2024 (PTI)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) वार्षिक पुरस्कार सोहळा आज म्हणजेच मंगळवारी (२३ जानेवारी) हैदराबादमध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात मोहम्मद शमी, शुभमन गिल, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांना वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला.

शुभमन गिल याची २०२३ या वर्षातील भारताचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. तर मोहम्मद शमी २०१९-२० साठी, रविचंद्रन अश्विन २०२०-२१ आणि जसप्रीत बुमराह २०२१-२२ या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली.

महिला खेळाडूंमध्ये दीप्ती शर्मा हिची २०१९-२० आणि २०२३ या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. तर स्मृती मानधना ही २०२०-२१ या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.

फारुख इंजिनियर यांना जीवनगौरव पुरस्कार

महान खेळाडू फारुख इंजिनियर यांना कर्नल सीएके नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी भारतासाठी ४६ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले. १९६१ ते १९७५ दरम्यान त्यांनी कसोटीत २६११ धावा केल्या. या काळात त्यांनी दोन शतके आणि १६ अर्धशतके झळकावली.

बीसीसीआयचा हा पुरस्कार सोहळा दर चार वर्षांनी आयोजित केला जातो. याआधी हा सोहळा २०१९ मध्ये झाला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी बीसीसीआयने हा कार्यक्रम उरकला आहे. पहिली कसोटी हैदराबादेत होणार आहे. यामुळे हेड कोच राहुल द्रविडसह टीम इंडियाचे बरेच खेळाडू या पुरस्करा सोहळ्यासाठी उपस्थित होते.

पॉली उम्रीगर पुरस्कार

२०१९-20 सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (पुरुष): मोहम्मद शमी

२०२०-२१ सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (पुरुष): रविचंद्रन अश्विन

२०२१-२२ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (पुरुष): जसप्रीत बुमराह

२०२२-२३ सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (पुरुष): शुभमन गिल

 

२०१९-२० सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (महिला): दीप्ती शर्मा

२०२०-२१ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (महिला): स्मृती मानधना

२०२२-२३ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (महिला): दीप्ती शर्मा

 

दिलीप सरदेसाई पुरस्कार

२०२२-२३ मध्ये सर्वाधिक कसोटी बळी: रविचंद्रन अश्विन

२०२२-२३ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा: यशस्वी जैस्वाल

 

२०१९-२० मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (महिला): प्रिया पुनिया

२०२०-२१ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (महिला): शेफाली वर्मा

२०२१-२२ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (महिला): एस मेघना

२०२२-२३ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (महिला): अमनजोत कौर

 

२०१९-२० सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण (पुरुष): मयंक अग्रवाल

२०२०-२१ सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण (पुरुष): अक्षर पटेल

२०२१-२२ सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण (पुरुष): श्रेयस अय्यर

२०२२-२३ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (पुरुष): यशस्वी जैस्वाल

माधवराव सिंधिया पुरस्कार

२०१९-२० रणजी करंडक सर्वाधिक विकेट्स (माधवराव सिंधिया पुरस्कार): जयदेव उनाडकट

२०२१-२२ रणजी करंडक सर्वाधिक विकेट्स: शम्स मुलाणी

२०२२-२३ रणजी करंडक सर्वाधिक विकेट्स : जलज सक्सेना

 

२०१९-२० रणजी करंडक सर्वाधिक धावा: राहुल दलाल

२०२१-२२ रणजी करंडक सर्वाधिक धावा : सरफराज खान

२०२२-२३ रणजी करंडक सर्वाधिक धावा : मयंक अग्रवाल

 

भारतातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट संघटना

२०१९-२०- मुंबई

२०२१-२२- मध्य प्रदेश

२०२३- मध्य प्रदेश

 

 

 

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi