बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी हा दिग्गज निवडणार टीम इंडिया, बीसीसीआयने आणला नवा सिलेक्टर
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी हा दिग्गज निवडणार टीम इंडिया, बीसीसीआयने आणला नवा सिलेक्टर

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी हा दिग्गज निवडणार टीम इंडिया, बीसीसीआयने आणला नवा सिलेक्टर

Published Sep 03, 2024 09:57 PM IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेआधी निवड समितीचे नवीन सदस्य म्हणून अजय रात्रा यांचे नाव जाहीर केले आहे

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी हा दिग्गज निवडणार टीम इंडिया, बीसीसीआयने आणला नवा सिलेक्टर
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी हा दिग्गज निवडणार टीम इंडिया, बीसीसीआयने आणला नवा सिलेक्टर

भारतीय संघाला १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या दृष्टिकोनातून ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे.

अशातच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या क्रिकेट सल्लागार समितीने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेआधी निवड समितीचे नवीन सदस्य म्हणून अजय रात्रा यांचे नाव जाहीर केले आहे. अजय रात्रा हे सलील अंकोला यांच्या जागी निवड समितीत स्थान घेतील. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आहेत.

अजय रात्रा यांना प्रदीर्घ अनुभव

भारताचे माजी यष्टिरक्षक फलंदाज अजय रात्रा यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्यांचा रेकॉर्डही प्रभावी आहे. आसाम, पंजाब आणि उत्तर प्रदेशचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे.

याशिवाय, २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेदरम्यान ते भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफचा एक भाग होता. त्यांच्याकडे अनुभव आहे, जो टीम इंडियासाठी उपयुक्त ठरू शकतो.

निवडकर्ता म्हणून, अजय रात्रा यांचे पहिले प्राधान्य सर्वोत्तम प्रतिभा ओळखणे असेल. रात्रा निवड समितीत कधी सामील होतील हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी ते टीम इंडियाची निवड करणार की नाही. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अजय रात्रा यांचे क्रिकेट करिअर

अजय रात्रा यांनी २००२ मध्ये भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले. यानंतर त्यांनी ६ कसोटीत १६३ धावा आणि १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ९० धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर भरपूर धावांची नोंद आहे. त्यांनी ९९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४०२९ धावा केल्या आहेत. याशिवाय त्यांनी ८९ लिस्ट-ए सामन्यांमध्ये १३८१ धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते हरियाणाकडून खेळायचे.

भारत-बांगलादेश कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला कसोटी सामना - १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर, सकाळी ९.३०, चेन्नई

दुसरा कसोटी सामना - २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर, सकाळी ९.३०, कानपूर

भारत-बांगलादेश टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला T20 सामना - ६ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता, धर्मशाला

दुसरा T20 सामना - ९ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता, दिल्ली

तिसरा T20 सामना - १२ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता, हैदराबाद

Whats_app_banner

संबंधित बातम्या