मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  देशांतर्गत क्रिकेटमधील या ५ गोलंदाजांना BCCI ने दिला स्पेशल करार, कारण काय? जाणून घ्या

देशांतर्गत क्रिकेटमधील या ५ गोलंदाजांना BCCI ने दिला स्पेशल करार, कारण काय? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 28, 2024 09:26 PM IST

BCCI Fast Bowling Annual Contracts List : बीसीसीआयने वेगवाग गोलंदाजीसाठी एका स्पेशल कराराची घोषणा केली आहे. या करारारात देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.

BCCI Fast Bowling Annual Contracts List
BCCI Fast Bowling Annual Contracts List

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपला वार्षिक केंद्रीय करार जाहीर केला आहे. बीसीसीआयने ४० क्रिकेटपटूंना त्यांचा वार्षिक केंद्रीय करार दिला आहे. या क्रिकेटपटूंना २०२३-२४ हंगामासाठी हा करार मिळाला आहे. 

टीम इंडियाच्या या खेळाडूंची ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या ४० नावांव्यतिरिक्त ५ खेळाडूंनाही स्पेशल करार मिळाले आहेत. 

बीसीसीआयने निवेदनात म्हटले आहे की, टीम इंडियाचच्या निवड समितीने वेगवान गोलंदाजीच्या कराराची शिफारस केली होती आणि त्यामुळे यात ५ विशेष नावांचा समावेश करण्यात आला आहे. 

आकाश दीप

वेगवान गोलंदाज आकाश दीपने इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटीत पदार्पण केले. त्याने पहिल्याच स्पेलमध्ये नवीन चेंडूवर ३ बळी घेतले. आकाशला वेगवान गोलंदाजीचा स्पेशल करार मिळाला आहे. बिहारचा आकाश बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.

विद्वत कवेरप्पा

विद्वत कवेरप्पा कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. त्याच्या नावावर २० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८० विकेट आहेत. यासह त्याने १८ लिस्ट ए सामन्यात ३८ विकेट्स घेतल्या आहेत. रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने १० विकेट घेतल्या आहेत. या रणजी मोसमातील अवघ्या ५ सामन्यांत त्याने २५ बळी घेतले आहेत. त्याला इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळण्याचीही संधी मिळाली होती.

यश दयाल

यूपीचा वेगवान गोलंदाज यश दयाल यालाही वेगवान गोलंदाजीचा स्पेशल करार मिळाला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज दयालने आतापर्यंत २३ प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्याच्या नावावर ७२ बळी आहेत. त्याला भारतीय संघात स्थान मिळाले पण खेळण्याची संधी मिळाली नाही.

उमरान मलिक

उमरान मलिक हा भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज मानला जातो. त्याने ताशी १५५ किमी पेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकला आहे. मात्र, उमरान सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. उमरानच्या नावावर १८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २४ विकेट आहेत.

विजयकुमार वैशाख

कर्नाटकचा वेगवान गोलंदाज विजयकुमार वैशाखचाही बीसीसीआयने वेगवान गोलंदाजीच्या करारात समावेश केला आहे. त्याने आतापर्यंत २० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८६ विकेट घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो.

WhatsApp channel