मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  BCCI Annual Contract : ईशान-अय्यरची हकालपट्टी, तर या खेळाडूंना मिळणार ७ कोटी, पाहा BCCI च्या कराराची संपूर्ण यादी

BCCI Annual Contract : ईशान-अय्यरची हकालपट्टी, तर या खेळाडूंना मिळणार ७ कोटी, पाहा BCCI च्या कराराची संपूर्ण यादी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 28, 2024 08:55 PM IST

BCCI Annual Contract List : बीसीसीआयने आपला वार्षिक केंद्रीय करार जाहीर केला आहे. यामध्ये ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला मोठा फटका बसला आहे. त्यांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

BCCI Annual Contract LIST
BCCI Annual Contract LIST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपला वार्षिक केंद्रीय करार जाहीर केला आहे. यामध्ये ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला मोठा फटका बसला आहे. त्यांना बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

याआधीच्या करारात श्रेयसला बी श्रेणीत आणि ईशानला सी श्रेणीत ठेवण्यात आले होते. त्यावेळी श्रेयसला वर्षाला ३ कोटी रुपये आणि ईशानला १ कोटी रुपये मिळत होते. मात्र आता त्यांचे इतके कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंची यादी (ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४)

A+ ग्रेड - रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.

ए ग्रेड -  आर अश्विन, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.

बी ग्रेड - सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.

सी ग्रेड - रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

आकाश दीप, विजयकुमार विशाक, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वत कवेरप्पा यांचा वेगवान गोलंदाजीच्या करारात समावेश करण्यात आला आहे.

या खेळाडूंची करारातून मुक्तता - याआधीच्या करारात श्रेयसला बी श्रेणीत आणि ईशानला सी श्रेणीत ठेवण्यात आले होते. त्यावेळी श्रेयसला वर्षाला ३ कोटी रुपये आणि ईशानला १ कोटी रुपये मिळत होते. मात्र आता त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

पंत-अक्षर अ मधून बी श्रेणीत-  या दोघांशिवाय ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांना अ श्रेणीतून बी श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

तर चेतेश्वर पुजाराला ब श्रेणीतून वगळण्यात आले आहे. उमेश यादव, शिखर धवन, दीपक हुडा आणि युझवेंद्र चहल यांना सी श्रेणीतून वगळण्यात आले आहे. या खेळाडूंना बीसीसीआयचा करार मिळाला नाही. 

या खेळाडूंना मिळाला करार- तर रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार यांना सी श्रेणीत स्थान मिळाले आहे.

कोणाला किती मानधन मिळणार

A+ ग्रेड – वार्षिक ७ कोटी रुपये

ग्रेड A - वार्षिक ५ कोटी

ग्रेड B – वार्षिक ३ कोटी रुपये

ग्रेड C - प्रति वर्ष १ कोटी रुपये

सरफराज-ध्रुव जुरेललाही करार मिळवण्याची संधी

युवा खेळाडू ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान यांना अजूनही सी ग्रेडमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे की, १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ या दरम्यान ३ कसोटी किंवा ८ एकदिवसीय किंवा १० टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या कोणत्याही खेळाडूचा सी ग्रेडमध्ये समावेश केला जाईल.

उदाहरणार्थ, आतापर्यंत ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २ कसोटी सामने खेळले आहेत. जर त्यांनी मालिकेतील शेवटचा सामना म्हणजेच धर्मशाला कसोटी सामना खेळला तर त्यांचा समावेश सी श्रेणीत होईल.

WhatsApp channel