Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीचे सर्व संघ जाहीर, भारत अ संघाचा कर्णधार बदलला, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीचे सर्व संघ जाहीर, भारत अ संघाचा कर्णधार बदलला, पाहा

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीचे सर्व संघ जाहीर, भारत अ संघाचा कर्णधार बदलला, पाहा

Updated Sep 10, 2024 06:09 PM IST

Duleep Trophy 2024 Squad For Second Round : दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीसाठी, भारत अ, भारत ब आणि भारत डी मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत, तर भारत क मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीत.

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीचे सर्व संघ जाहीर, भारत अ संघाचा कर्णधार बदलला, पाहा
Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीचे सर्व संघ जाहीर, भारत अ संघाचा कर्णधार बदलला, पाहा (PTI)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दुलीप ट्रॉफी २०२४ च्या दुसऱ्या फेरीसाठी सर्व संघांची घोषणा केली आहे. १२ ऑक्टोबरपासून अनंतपूरमध्ये दुसरी फेरी सुरू होणार आहे. ट्रॉफीच्या पहिल्या फेरीतील एक सामना बेंगळुरूमध्ये आणि दुसरा अनंतपूरमध्ये खेळला गेला.

दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीसाठी, भारत अ, भारत ब आणि भारत डी मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत, तर भारत क मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीत. टीम इंडियाचा फिनीशर रिंकू सिंग याचा भारत बी मध्ये समावेश करण्यात आला आहे.

कोणत्या संघात काय बदल झाले?

भारत अ मधील बदल

भारत अ संघाचा कर्णधार शुभमन गिल, केएल राहुल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव आणि आकाश दीप हे संघातू बाहेर पडले आहेत. या सर्व खेळाडूंचा बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे.

निवडकर्त्यांनी गिलच्या जागी प्रथम सिंग (रेल्वे), केएल राहुलच्या जागी अक्षय वाडकर (विदर्भ सीए) आणि ध्रुव जुरेलच्या जागी एसके रशीद (आंध्र सीए) यांचा समावेश केला आहे.

याशिवाय फिरकीपटू शम्स मुलानी कुलदीप यादवच्या जागी अ संघात आला आहे. तर आकाशदीपच्या जागी आकिब खान (UPCA) संघाचा भाग असेल. मयंक अग्रवाल याला भारत अ संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

भारत अ चा संपूर्ण संघ

मयंक अग्रवाल (कर्णधार), रियान पराग, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, प्रसिध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, कुमार कुशाग्रा, शास्वत रावत, प्रथम सिंग, अक्षय वाडकर, एसके रशीद, शम्स मुलानी, आकिब खान.

भारत ब संघातील बदल

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारत ब कडून ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, सरफराज खान आणि यश दयाल यांचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.

पंत आणि जैस्वाल यांच्या जागी सुयश प्रभुदेसाई आणि रिंकू सिंग यांना संघात आणण्यात आले आहेत. सरफराज खानही दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध असेल. बाकी हिमांशू मंत्रीचा संघात समावेश करण्यात आला आहे.

भारत ब संघ असा आहे

अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), सरफराज खान, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, रिंकू सिंग, हिमांशू मंत्री (यष्टीरक्षक) यष्टिरक्षक).

भारत डी संघातील बदल

भारत डी मधील अक्षर पटेलची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे किरकोळ दुखापतीमुळे बाहेर आहे. अक्षरच्या जागी निशांत सिंधू आणि तुषारच्या जागी भारत अ च्या विद्वत कवेरप्पला स्थान देण्यात आले आहे.

भारत डी संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, सरांश जैन, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (विकेटकीपर), सौरभ कुमार, संजू सॅमसन (विकेटकीपर), निशांत सिंधू , विदावथा कवरेप्पा.

Whats_app_banner

संबंधित बातम्या