भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बहु-फॉरमॅट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडचा या संघात समावेश करण्यात आला आहे. वास्तविक, समितचा भारताच्या अंडर-१९ संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय अंडर-१९ संघाला ऑस्ट्रेलियन अंडर-१९ संघाविरुद्ध एकदिवसीय आणि ४ दिवसीय सामने खेळायचे आहेत. या दोन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी समितला टीम इंडियात संधी मिळाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर-१९ मालिका २१ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
ज्युनियर निवड समितीने ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्धच्या आगामी बहु-स्वरूप IDFC FIRST बँक घरच्या मालिकेसाठी भारताच्या अंडर-१९ संघाची निवड केली आहे. या मालिकेत पुद्दुचेरी आणि चेन्नईमध्ये तीन ५० षटकांचे सामने आणि दोन ४ दिवसीय सामने खेळवले जातील.
यूपीचा स्टार फलंदाज मोहम्मद अमानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताच्या अंडर-१९ संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर ४ दिवसीय सामन्यांच्या मालिकेत मध्य प्रदेशचा सोहम पटवर्धन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. समितबद्दल बोलायचे तर तो नुकताच महाराजा टी-२० ट्रॉफीमध्ये खेळला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा अंडर-१९ संघ - रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशसिंग पंगालिया (यष्टीरक्षक) , समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत आणि मोहम्मद अनन.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा अंडर-१९ संघ – वैभव सूर्यवंशी, नित्या पांड्या, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशी सिंग पंगालिया (यष्टीरक्षक), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग आणि मोहम्मद अनन.