Sydney Thunder vs Hobart Hurricanes : बिग बॅश लीग २०२४-२५ चा अंतिम सामना आज (२७ जानेवारी) होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी थंडर यांच्यात खेळला जात आहे. होबार्ट येथील बेलेरिव्ह ओव्हल स्टेडिमयवर होबार्टचा कर्णधार नॅथन एलिस याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर सिडनी थंडरने निर्धारित २० षटकात ७ बाद १८२ ठोकल्या आहेत. होबार्ट हरिकेनला बिग बॅश लीग जिंकण्यासाठी १८३ धावा करायच्या आहेत.
सिडनीकडून सलामीवीर जेसन संघा याने ६७ धावांची शानदार खेळी केली. त्याने ४२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारले. यानंतर दुसरा सलामीवीर आणि सिनडीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने ३२ चेंडूत ४८ धावा केल्या. वॉर्नरने ५ चौकार आणि एक षटकार मारला. दोघांनी १० षटकात ९७ धावांची सलामी दिली. पण यानंतर एक विकेट पडताच सिडनीची फलंदाजी ढेपाळली.
होबार्टकडून रिले मेरडीथ आणि कर्णधार नॅथन एलिस यांनी धारदार गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.
होबार्ट हरिकेन्स संघाने या हंगामात केवळ २ सामने गमावले आहेत. नॅथन एलिसच्या नेतृत्वाखालील होबार्ट हरिकेन्सने क्वालिफायर सामन्यात सिडनी सिक्सर्सचा १२ धावांनी पराभव केला. दुसरीकडे, प्लेऑफ सामन्यात सिडनी थंडरने मेलबर्न स्टार्सचा २१ धावांनी पराभव केला होता.
होबार्ट हरिकेन- मिचेल ओवेन, कॅलेब ज्युवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), बेन मॅकडरमॉट, निखिल चौधरी, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, नॅथन एलिस (कर्णधार), कॅमेरॉन गॅनन, पीटर हॅटझोग्लू, रिले मेरेडिथ.
सिडनी थंडर्स- जेसन संघा, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मॅथ्यू गिल्केस, सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), ऑलिव्हर डेव्हिस, ख्रिस ग्रीन, जॉर्ज गार्टन, नॅथन मॅकअँड्र्यू, टॉम अँड्र्यूज, वेस अगर, तन्वीर संघा
संबंधित बातम्या