Baroda vs Mumbai SMAT 2024 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ मध्ये पहिली सेमी फायनल आज (१३ डिसेंबर) बंगळुरूच्या चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडिमयवर खेळली गेली. यात श्रेयस अय्यरच्या मुंबईने कृणाल पंड्याच्या बडोदा संघाचा पराभव केला.
मुंबईकडून अजिंक्य रहाणे याने ५६ चेंडूत ९८ धावा ठोकल्या. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि ५ षटकार ठोकले. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
तत्पूर्व, या सामन्यात मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर बडोद्याचा संघ २० षटकात ७ बाद १५८ धावा करू शकला. प्रत्युत्तरात मुंबईने १७.२ षटकात ४ बाद १६४ धावा करत सामना जिंकला.
या संपूर्ण स्पर्धेत रहाणेची बॅट तुफानी शैलीत चालली आहे. याआधी त्याने उपांत्यपूर्व फेरीतही अर्धशतक झळकावून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. रहाणे हळुहळू शतकाकडे वाटचाल करत होता, पण तो अभिमन्यू सिंगच्या चेंडूवर झेलबाद झाला आणि शतक झळकावण्यापासून वंचित राहिला. मुंबईच्या विजयासाठी २ धावांची गरज होती, तसेच, रहाणेच्या शतकासाठीही दोन धावा हव्या होत्या. अशा स्थितीत रहाणेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण तो झेलबाद झा
रहाणेशिवाय कर्णधार श्रेयस अय्यरने ३० चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या.
तर बडोद्याकडून हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, भानू पानिया यांसारखे फलंदाज फ्लॉप ठरले. यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
बडोदा- शाश्वत रावत, अभिमन्यू सिंग राजपूत, हार्दिक पांड्या, कृणाल पंड्या (कर्णधार), शिवालिक शर्मा, भानू पानिया, विष्णू सोलंकी (विकेटकीपर), अतित शेठ, महेश पिठिया, लुकमान मेरीवाला, आकाश महाराज सिंग.
मुंबई- पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), तनुष कोटियन, मोहित अवस्थी, अथर्व अंकोलेकर.
संबंधित बातम्या