Syed Mushtaq Ali Trophy 2024 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ मध्ये बडोदा संघाने इतिहास रचला आहे. कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखालील बडोदा संघाने गुरुवारी (५ डिसेंबर) सिक्कीमविरुद्ध २० षटकात ३४९ धावांचा पाऊस पाडला. टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा हा नवा विक्रम आहे.
यासह हा संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ३०० हून अधिक धावा करणारा पहिला संघ ठरला.
या फॉरमॅटमध्ये आतापर्यंतचा सर्वोच्च सांघिक धावांचा विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर होता. त्यांनी यावर्षी ऑक्टोबरमध्ये झांबियाविरुद्ध ३४४ धावा केल्या होत्या.
सिक्कीमविरुद्धच्या आजच्या बडोद्याचा फलंदाज भानू पानिया याने अवघ्या ५१ चेंडूत १३४ धावा ठोकल्या. त्याने ५१ चेंडूत १५ षटकार आणि ५ चौकार मारले.
याशिवाय अभिमन्यू सिंग, विष्णू सोलंकी आणि शिवालिक शर्मा यांनीही अर्धशतके झळकावली. याआधी या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या पंजाबच्या नावावर होती, जी त्यांनी गेल्या मोसमात आंध्रविरुद्ध २७५ धावा केल्या होत्या.
बडोदा संघाकडून १३४ धावा करणाऱ्या पुनियाने आपल्या खेळीत १५ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश केला. त्याच्याशिवाय शिवालिकने १७ चेंडूत ५५ धावा, अभिमन्यूने १७ चेंडूत ५३ धावा, विष्णू सोलंकीने १६ चेंडूत ५० धावा आणि शाश्वत रावतने १६ चेंडूत ४३ धावा केल्या. बडोद्याच्या डावात एकूण १८ चौकार आणि ३७ षटकार मारले गेले. यामुळे सिक्कीमच्या गोलंदाजांसाठी हा सामना दुःस्वप्नसारखा ठरला.
यासोबतच एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही रचला आहे. यापूर्वी हा विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर होता. त्यांनी झांबियाविरुद्ध २७ षटकार ठोकले होते.
बडोदा ३४९/५ वि सिक्कीम – २०२४
झिम्बाब्वे ३४४/४ वि झांबिया – २०२४
नेपाळ ३१४/३ वि मंगोलिया – २०२३
भारत २९७/६ वि बांगलादेश – २०२४
संबंधित बातम्या