
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन टी-20 सामन्यांची मालिका ६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. एकीकडे भारतही युवा संघ तयार करण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे बांगलादेशनेही आगामी मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संघात संधी दिली आहे.
आत्तापर्यंत बांगलादेशला फक्त एकदाच T20 सामन्यात भारताला पराभूत करता आले आहे. बांगलादेश संघात काही खेळाडू आहेत जे भारतीय संघासाठी अडचणी निर्माण करू शकतात.
मुस्तफिजुर रहमान हा बांगलादेशच्या मुख्य वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे, ज्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीत ८५ बळी घेतले आहेत. त्याच्या गोलंदाजीत वैविध्य आहे, जे जगातील कोणत्याही फलंदाजाला चकवा देण्यास सक्षम आहे.
रहमान हा पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर स्पेशालिस्ट जाते आणि त्याला खूप अनुभवही आहे. त्यामुळे तो युवा भारतीय संघासमोर अडचणी मांडू शकतो.
बांगलादेशच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक महमुदुल्ला वयाच्या ३८ व्या वर्षीही संघाचा अविभाज्य भाग आहे. त्याने १३८ सामन्यांच्या T20 कारकिर्दीत २३९४ धावा केल्या आहेत, ज्यात ८ अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने फलंदाजी केलेली नाही, पण टीम इंडियाने त्याला कमी लेखण्याची चूक कधीही करू नये.
मेहदी हसन मिराज हा बांगलादेशच्या सर्वात उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. २५ टी-20 सामन्यात २४८ धावा करण्यासोबतच त्याने १३ विकेट्सही घेतल्या आहेत. तब्बल १४ महिन्यांनंतर तो बांगलादेशच्या टी-20 संघात पुनरागमन करत आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने केवळ बॅटनेच चांगली कामगिरी केली नाही तर आपल्या गोलंदाजीने पाकिस्तानी फलंदाजांना त्रस्त केले. नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्य कसोटी मालिकेतही त्याने चांगली कामगिरी केली होती.
संबंधित बातम्या
