बांगलादेश क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. बांगलादेशने कसोटी सामन्यात बलाढ्य पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने यजमान पाकिस्तानचा १० विकेट्सनी धुव्वा उडवला.
या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव ६ बाद ४४८ धावांवर घोषित केला. यानंतर संघ दुसऱ्या डावात १४६ धावांवर सर्वबाद झाला.
प्रत्युत्तरात बांगलादेशने पहिल्या डावात ५६५ धावा केल्या. दुसऱ्या डावात एकही गडी न गमावता ३० धावा करत सामना जिंकला.
पाकिस्तानने पहिल्या डावात ६ विकेट गमावून ४४८ धावा केल्या होत्या. यानंतर संघाने डाव घोषित केला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी शतकी खेळी खेळली. रिझवानने २३९ चेंडूत नाबाद १७१ धावा केल्या. त्याने ११ चौकार आणि ३ षटकार मारले. शकीलने १४१ धावांची खेळी केली. त्याने ९ चौकार मारले. सॅम अयुबने ५६ धावांचे योगदान दिले. बाबर आझम काही विशेष करू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला.
प्रत्युत्तरात बांगलादेशने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पहिल्या डावात सर्वबाद होईपर्यंत त्यांनी ५६५ धावा केल्या. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने १९१ धावांची खेळी केली. ३४१ चेंडूंचा सामना करताना त्याने २२ चौकार आणि १ षटकार लगावला. याआधी सदमान इस्लामने ९३ धावांची दमदार खेळी केली. इस्लामने १२ चौकार मारले.
लिटन दासने अर्धशतक झळकावले. त्याने ७८ चेंडूंचा सामना करताना ५६ धावा केल्या. त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला. मेहदी हसन मिराजने ७७ धावांची खेळी केली. मोमिनुल हकने ५० धावांचे योगदान दिले.
दुसऱ्या डावात पाकिस्तानची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. मोहम्मद रिझवानशिवाय एकही फलंदाज चालला नाही. रिझवानने ८० चेंडूत ५१ धावा केल्या. त्याने ६ चौकार मारले. सलामीवीर शफिकने ३७ धावा केल्या. त्याने ३ चौकार मारले. सॅम अयुब १ धावा करून बाद झाला. बाबर आझम २२ धावा करून बाद झाला. त्याने ३ चौकार मारले. तर पहिल्या डावातील शतकवीर सौद शकील शून्यावर बाद झाला.
बांगलादेशने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता सामना जिंकला. त्यांच्याकडून सलामीवीर झाकीर हसनने नाबाद १५ आणि सदमानने नाबाद ९ धावा केल्या. या विजयासह बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.