Bajrang Punia Ban : बजरंग पुनियावर कुस्ती खेळण्यास बंदी, कोचिंगही देऊ शकणार नाही, जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Bajrang Punia Ban : बजरंग पुनियावर कुस्ती खेळण्यास बंदी, कोचिंगही देऊ शकणार नाही, जाणून घ्या

Bajrang Punia Ban : बजरंग पुनियावर कुस्ती खेळण्यास बंदी, कोचिंगही देऊ शकणार नाही, जाणून घ्या

Nov 27, 2024 10:53 AM IST

Bajrang Punia banned : कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्यावर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याने लघवीचा नमुना देण्यास नकार दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Bajrang Punia ban : बजरंग पुनियावर कुस्ती खेळण्यास बंदी, कोचिंगही देऊ शकणार नाही, जाणून घ्या
Bajrang Punia ban : बजरंग पुनियावर कुस्ती खेळण्यास बंदी, कोचिंगही देऊ शकणार नाही, जाणून घ्या (Commonwealth Sport Twitter)

भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्यावर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याने लघवीचा नमुना देण्यास नकार दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने (NADA) नियम २.३ चे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर बंदी घातली आहे.

भारताचा टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया याला NADA ने १० मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवड चाचणी दरम्यान डोपिंग चाचणीसाठी यरिन सॅंपल देण्यास सांगण्यात आले होते. पण त्याने तसे केले नाही. आता त्याचे चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

NADA ने सुरुवातीला २३ एप्रिल रोजी बजरंग पुनियाला त्याच गुन्ह्यासाठी निलंबित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता, त्यानंतर त्याला जागतिक प्रशासकीय मंडळ, UWW ने निलंबित केले होते. या निलंबनाचा अर्थ त्याला आता स्पर्धात्मक कुस्तीत भाग घेता येणार नाही किंवा परदेशात प्रशिक्षकपदाची संधीही मिळणार नाही.

बजरंगने निलंबनाला विरोध केला

बजरंगने सुरुवातीला या निलंबनाचा निषेध केला होता. यानंतर ३१ मे रोजी, NADA च्या डोपिंग विरोधी पॅनेलने (ADDP) आरोपांची औपचारिक नोटीस जारी होईपर्यंत त्याच्यावरील निलंबन तात्पुरते मागे घेतले होते.

मात्र, पुन्हा २३ जून रोजी नाडाने त्यांना या आरोपांची औपचारिक माहिती दिली. परंतु पुनियाने आरोपांविरुद्ध ११ जुलै रोजी आव्हान दाखल केले, त्यावर २० सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली.

बजरंग पुनिया यांचा राजकारणात प्रवेश

कुस्तीपटू बजरंग पुनिया याने ऑक्टोबर महिन्यात किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. याआधी त्याने कुस्तीपटू विनेश फोगटसोबत राजकीय मैदानात उतरून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Whats_app_banner