बांगलादेश क्रिकेट संघाने रावळपिंडीत इतिहास रचला. नझमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा ६ विकेटने पराभव केला. यासह बांगलादेशने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० ने जिंकली.
बांगलादेशने प्रथमच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. बांगलादेशच्या या ऐतिहासिक विजयात मेहंदी हसन मिराज, लिटन दास, हसन महमूद आणि नाहिद राणा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कसोटी मालिकेतील पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानला दुसरा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा होता, पण शान मसूदच्या संघाला ते शक्य झाले नाही.
दरम्यान, बाबर आझमने मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये अत्यंत खराब कामगिरी केली. यानंतर आता त्याच्या निवृत्तीचे दावे करण्यात येत आहेत. पण बाबर आझमने खरोखरच निवृत्तीची घोषणा केली आहे का? खरं काय आपण येथे जाणून घेणार आहोत.
पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धची मालिका गमावल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बाबर आझमने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचा दावा केला होता. पोस्टमध्ये लिहिले आहे की, "खूप विचार केल्यानंतर, मी कसोटी क्रिकेटमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझा फॉर्म शोधण्यासाठी दोन वर्षांच्या संघर्षानंतर हा निर्णय घेतला आहे."
विशेष म्हणजे, अशा प्रकारची केवळ एकच पोस्ट नाही, तर एकापेक्षा जास्त पोस्ट दिसल्या ज्यात बाबर आझमच्या कसोटी निवृत्तीचा दावा केला गेला आहे.
पण सोशल मीडियावरील या पोस्ट आणि दावे पूर्णपणे खोटे आहेत. बाबर आझमने कसोटीतून निवृत्तीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
बाबर दीर्घकाळापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. बाबर सध्या त्याच्या आजपर्यंतच्या सर्वात वाईट टप्प्यात आहे. त्याने कसोटीच्या शेवटच्या १६ डावात केवळ १९० धावा केल्या आहेत. कसोटीशिवाय टी-२० आणि वनडेमध्येही बाबरचा फॉर्म ढासळताना दिसत आहे.
As the first post gained momentum, another one landed two hours later. This time from an account with more followers and an X premium subscription, which meant greater reach.
The retirement post from 'Babar Azam - Parody' handle mocked the Pakistan white-ball skipper for preparing batting-friendly pitches during his tenure as the red-ball skipper to conjure runs.
आश्चर्याची बाब म्हणजे बाबर आझमने कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावून ६१६ दिवसांपेक्षा जास्त काळ झाला आहे. त्याला जवळपास २० महिन्यांत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. बाबरची कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी खरोखरच लाज आणणारी आहे. २०२२ नंतर त्याच्या बॅटमधून मोठी खेळी आलेली नाही.
बाबर आझमने डिसेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १६१ धावांची इनिंग खेळली होती. त्यानंतर त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या केवळ ४१ धावा आहे. बाबर इतर फॉरमॅटमध्ये धावा करतो असे नाही. गेल्या दोन वर्षांपासून बाबर प्रत्येक फॉरमॅटमध्ये धावा काढण्यासाठी धडपडत आहे.
एकेकाळी जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहलीही धावा काढण्यासाठी धडपडत होता. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि दमदार पुनरागमन करत नेत्रदीपक कामगिरी केली.
बाबर आझम यानेही विराटकडून शिकावे आणि क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घ्यावी, असा सल्ला चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबरला देत आहेत.