SL vs PAK : पराभव होताच बाबर जमानवर भडकला, मैदानावरच काढला राग, पाहा VIRAL VIDEO
SL vs PAK Asia Cup 2023 : अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा दोन गड्यांनी पराभव करत आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळं पाकिस्तान स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
SL vs PAK Asia Cup 2023 : यंदाच्या आशिया कपमध्ये मोठी उलटफेर झाली आहे. बलाढ्य संघ असलेल्या पाकिस्तानला श्रीलंकेने धक्का देत स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळं आता येत्या रविवारी भारत आणि श्रीलंकेत आशिया कपच्या फायनलचा थरार रंगणार आहे. परंतु स्पर्धेतून पाकिस्तान बाहेर झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हारिस रऊफ आणि नसीम शाह यांना दुखापत झाल्याने दोन्ही बॉलरच्या अनुपस्थितीचा फटका पाकिस्तानी संघाला बसला आहे. परिणामी श्रीलंकेने अखेरच्या चेंडूवर दोन धावा घेत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. परंतु पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमच्या चेहऱ्यावरून राग, नाराजी आणि संताप दिसून येत होता. त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ट्रेंडिंग न्यूज
नेमकं काय झालं?
श्रीलंकेला अखेरच्या दोन षटकात विजयासाठी १२ धावांची आवश्यकता होती. परंतु भेदक मारा झाल्याने सामना चांगलाच रंगला. अखेरच्या दोन चेंडूंवर सहा धावांची गरज होती. त्याचवेळी असालंकाने जमान खानला चौकार मारला आणि तिथंच पाकिस्तानचा डाव गंडला. अखेरच्या चेंडूवर असालंकाने सहज चेंडू टोलवत कोणत्याही अडचणीशिवाय दोन धावा घेत विजय साजरा केला. त्यावेळी कर्णधार बाबर आझम गोलंदाज जमान खानवर ओरडताना दिसला. अखेरचा चेंडू असालंकाच्या पॅडलाईनवर कशासाठी टाकला?, असा प्रश्न बाबर विचारत असल्याचं त्याच्या देहबोलीतून दिसून येत आहे.
पराभव होताच पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमचा चेहरा पडला. त्यानंतर त्याने तातडीने सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन करत मैदानातून बाहेर होणं पसंत केलं. थरारक सामन्यात विजय मिळाल्याने श्रीलंकन खेळाडू बराच वेळ मैदानावर आनंदोत्सव साजरा करत होते. त्यावेळी बाबर आझमसह अनेक पाकिस्तानी खेळाडू पडलेल्या चेहऱ्याने निराश होत पव्हेलियनच्या दिशेने निघाल्याचं पाहायला मिळालं. पदार्पणाच्या सामन्यातच श्रीलंकेन फलंदाजांनी धुलाई केल्याने जमान खानला मैदानावरच रडू कोसळलं. सामन्यातील या क्षणाचा व्हिडिओ अनेकांनी शेयर करत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.