New Zealand vs Pakistan, Final : पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू बाबर आझम याने इतिहास रचला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तिरंगी मालिकेतील अंतिम सामना कराचीमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात बाबर आझम २९ धावा करून बाद झाला. पण त्याने एक विश्वविक्रम मोडला आहे.
बाबरने टीम इंडियाच्या विराट कोहली याला मागे टाकले. बाबर आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ६००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात तिरंगी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे संघ फायनलमध्ये पोहोचले असून त्यांच्यात विजेतपदासाठी कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर सामना सुरू आहे.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हे वृत्त लिहेपर्यंत पाकिस्तानने १७ षटकांत ३ गडी गमावून ६९ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि फखर जमान सलामीला आले. फखर १० धावा करून बाद झाला. तर बाबरने ३४ चेंडूंचा सामना करत २९ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला. या सामन्यात बाबरने वनडेत ६ हजार धावा पूर्ण केल्या.
बाबरने वनडेमध्ये सर्वात जलद ६००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने विश्वविक्रम मोडला आहे. मात्र या यादीत बाबर संयुक्तपणे अव्वल स्थानी पोहोचला आहे. बाबरने १२३ डावात ६००० धावा पूर्ण केल्या आहेत. बाबरसह दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू हाशिम आमला या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. बाबरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९ शतके आणि ३४ अर्धशतके केली आहेत.
खरंतर, एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने १३६ डावात ६००० धावा पूर्ण केल्या होत्या. बाबरने १२३ डावात हा टप्पा गाठला. कोहलीसोबतच बाबरने केन विल्यमसन आणि डेव्हिड वॉर्नर यांनाही मागे टाकले. विल्यमसनने १३९ डावात ही कामगिरी केली होती. तर वॉर्नरने १३९ डावात ६००० धावा पूर्ण केल्या होत्या.
न्यूझीलंड- विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, जेकब डफी, विल्यम ओरूरके.
पाकिस्तान- फखर जमान, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णदार आणि विकेटकीपर), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद.
संबंधित बातम्या