मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Cricket Record News : बाबर आझमनं रचला टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम; विराट, गेललाही टाकलं मागे

Cricket Record News : बाबर आझमनं रचला टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम; विराट, गेललाही टाकलं मागे

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 21, 2024 04:36 PM IST

Babar Azam T20 Runs World Record : पाकिस्तानी क्रिकेट संघातील स्टार फलंदाज बाबर आझम यानं रचला टी-२० क्रिकेटमध्ये मोठा विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवला आहे.

Babar Azam T20 Runs World Record
Babar Azam T20 Runs World Record

Babar Azam T20 Record : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर बाबर आझम यानं टी-२० क्रिकेटचा सर्वात मोठा विश्वविक्रम केला आहे. टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगानं १०,००० धावा करण्याचा विक्रम त्यानं रचला आहे. तसंच, ही कामगिरी करणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.

पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२४ मध्ये पेशावर झल्मीकडून फलंदाजी करताना बाबरनं हा विश्वविक्रम केला. विशेष म्हणजे बाबर आझमनं आपली जुनी फ्रँचायझी टीम कराची किंग्स विरुद्ध ही कामगिरी केली. बाबर आझमनं कराची किंग्जविरुद्ध दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दोन धावा घेत टी-ट्वेंटीतील १०,००० धावांचा टप्पा पार केला. बाबरनं मीर हमजाच्या चेंडूवर आपला आवडता कव्हर ड्राइव्ह खेळून हा विक्रम केला.

विराट आणि ख्रिस गेललाही टाकलं मागे

वयाच्या अवघ्या २९ वर्षे १२० दिवसांत बाबरनं ही कामगिरी केली. बाबरनं आपल्या २७१व्या डावात ही कामगिरी केली. यापूर्वी हा विश्वविक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. ख्रिस गेलनं २८५ डावांमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. गेलनं २०१७ मध्ये ही कामगिरी केली होती. तर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यानं २९९ डावांमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला होता.

१३ फलंदाजांनी पार केलाय १० हजार धावांचा टप्पा

T20 च्या इतिहासात १०,००० धावांचा टप्पा पार करणारा बाबर हा केवळ १३वा फलंदाज आहे. त्याच्या आधी ख्रिस गेल, शोएब मलिक, किरॉन पोलार्ड, ॲलेक्स हेल्स, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, ॲरॉन फिंच, रोहित शर्मा, जोस बटलर, कॉलिन मुनरो, जेम्स विन्स आणि डेव्हिड मिलर यांनी ही कामगिरी केली आहे. 

विराट कितव्या क्रमांकावर

टी-२० मध्ये सर्वात वेगानं १०,००० धावा करणाऱ्या बाबरनंतर ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. चौथ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे. वॉर्नरनं ३०३ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. यानंतर ॲरोन फिंचचा क्रमांक लागतो. त्यानं ३२७ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.

WhatsApp channel