Babar Azam : पाकिस्तानचा विराट कोहली पुन्हा फुस्स, बाबर आझमची हकालपट्टी होणार? शेवटचं शतक कधी केलं? पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Babar Azam : पाकिस्तानचा विराट कोहली पुन्हा फुस्स, बाबर आझमची हकालपट्टी होणार? शेवटचं शतक कधी केलं? पाहा

Babar Azam : पाकिस्तानचा विराट कोहली पुन्हा फुस्स, बाबर आझमची हकालपट्टी होणार? शेवटचं शतक कधी केलं? पाहा

Published Sep 02, 2024 06:00 PM IST

Babar Azam News : कसोटी क्रिकेटमध्ये बाबर आझमची बॅट दोन वर्षांपासून शांत आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत बाबरला १६ च्या सरासरीने केवळ ६४ धावा करता आल्या.

Babar Azam : पाकिस्तानचा विराट कोहली पुन्हा फुस्स, बाबर आझमची हकालपट्टी होणार? शेवटचं शतक कधी केलं? पाहा
Babar Azam : पाकिस्तानचा विराट कोहली पुन्हा फुस्स, बाबर आझमची हकालपट्टी होणार? शेवटचं शतक कधी केलं? पाहा

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझम सध्या खराब फॉर्मात आहे. त्याचा वाईट काळ संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. 'किंग' म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाबर आझमचा फ्लॉप शो जवळपास दोन वर्षांपासून सुरू आहे.

घरच्या मैदानावर आणि बांगलादेशसारख्या संघाविरुद्ध खेळतानाही बाबरला धावा करता आल्या नाहीत. यानंतर आता त्याच्यावर सर्वत्र जोरदार टीका होत आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बाबरने ० (२), २२(५०),३१(७७) आणि ११(१८) अशा धावा केल्या. ४ डावात त्याच्या बॅटमधून १६ च्या सरासरीने फक्त ६४ धावा आल्या आहेत. यापूर्वी बाबरला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धही धावा करता आल्या नव्हत्या.

बाबरने अर्धशतक करून ६१६ दिवस झाले

आश्चर्याची बाब म्हणजे बाबर आझमने कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावून ६१६ दिवसांपेक्षा जास्त काळ झाला आहे. त्याला जवळपास २० महिन्यांत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. बाबरची कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी खरोखरच लाज आणणारी आहे. २०२२ नंतर त्याच्या बॅटमधून मोठी खेळी आलेली नाही.

बाबर आझमने डिसेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १६१ धावांची इनिंग खेळली होती. त्यानंतर त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या केवळ ४१ धावा आहे. बाबर इतर फॉरमॅटमध्ये धावा करतो असे नाही. गेल्या दोन वर्षांपासून बाबर प्रत्येक फॉरमॅटमध्ये धावा काढण्यासाठी धडपडत आहे.

बाबरने विराटकडून शिकावे

एकेकाळी जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहलीही धावा काढण्यासाठी धडपडत होता. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि दमदार पुनरागमन करत नेत्रदीपक कामगिरी केली.

बाबर आझम यानेही विराटकडून शिकावे आणि क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घ्यावी, असा सल्ला चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबरला देत आहेत.

पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार

इंग्लंडचा संघ यावर्षी ऑक्टोबरमध्ये कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानात येणार आहे. यात बाबर आझम असेल की नाही हा नंतरचा विषय आहे, पण आता त्याच्यासमोर आव्हाने खूप मोठी आहेत.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांची मालिका ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका पाकिस्तानात खेळवली जाणार आहे ही दिलासा देणारी बाब आहे. मात्र, बाबर आझमचा फॉर्म कधी परत येतो आणि तो किती काळ पाकिस्तानी संघाचा सदस्य राहतो हे पाहणे बाकी आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या