Babar Aazm : सपाट पीचवर बाबर आझम पुन्हा फ्लॉप, मुल्तान कसोटीत शान मसूद-अब्दुल्ला शफीकनं धावांचा पाऊस पाडला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Babar Aazm : सपाट पीचवर बाबर आझम पुन्हा फ्लॉप, मुल्तान कसोटीत शान मसूद-अब्दुल्ला शफीकनं धावांचा पाऊस पाडला

Babar Aazm : सपाट पीचवर बाबर आझम पुन्हा फ्लॉप, मुल्तान कसोटीत शान मसूद-अब्दुल्ला शफीकनं धावांचा पाऊस पाडला

Updated Oct 07, 2024 07:00 PM IST

Pak vs Eng Multan Test : बाबर आझम पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. इंग्लंडविरुद्ध मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत तो ७१ चेंडूत केवळ ३० धावा करून बाद झाला.

Babar Aazm : सपाट पीचवर बाबर आझम पुन्हा फ्लॉप, मुल्तान कसोटीत शान मसूद-अब्दुल्ला शफीकनं धावांचा पाऊस पाडला
Babar Aazm : सपाट पीचवर बाबर आझम पुन्हा फ्लॉप, मुल्तान कसोटीत शान मसूद-अब्दुल्ला शफीकनं धावांचा पाऊस पाडला (AFP)

मुलतानच्या पाटा खेळपट्टीवर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद आणि अब्दुल्ला शफीक यांनी शानदार खेळी खेळून आपला फॉर्म परत आणला. पण त्याच पीचवर पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार आणि किंग बाबर आझम पुन्हा एकदा सपशेल फ्लॉप झाला. 

बाबरने ७१ चेंडू खेळले, पण त्याला खास काही करता आले नाही. दिवसाच्या अखेरीस तो बाद झाला. 

मसूद आणि शफीक यांच्यात २५३ धावांची भागिदारी

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून (७ ऑक्टोबर) मुलतान येथे सुरू झाला. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

सलामीवीर सॅम अयुब लवकर आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. पण यानंतर कर्णधार शान मसूद आणि दुसरा सलामीवीर अब्दुल्ला शफीकने जबाबदारी स्वीकारली. या दोघांनी मिळून पाकिस्तानसाठी दुसऱ्या विकेटसाठी २५३ धावांची भागीदारी केली, जो एक विक्रम आहे. शान मसूदने १५१ धावांची उत्कृष्ट खेळी केली तर अब्दुल्ला शफीकने १०२ धावांची खेळी केली.

लागोपाठ दोन विकेट पडल्याने पाकिस्तान संघ अडचणीत 

शान मसूद आणि अब्दुल्ला शफीक बाद होताच पाकिस्तानी संघ पुन्हा अडचणीत आला. पाकिस्तानची पहिली विकेट केवळ ८ धावांवर पडली होती. यानंतर २६१ धावांवर दुसरी विकेट अब्दुल्ला शफीकच्या रूपाने पडली.

अब्दुल्ला बाद झाल्यानंतर काही वेळातच संघाची धावसंख्या २६३ धावांवर असताना शान मसूदही बाद झाला. यानंतर किंग बाबर आझम क्रीझवर आला. तोही मोठी खेळी खेळून आपला फॉर्म परत मिळवेल, अशी अपेक्षा होती, पण असे काही घडू शकले नाही.

बाबर आझम ३० धावांवर बाद

बाबर आझम ७१ चेंडूत केवळ ३० धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने ५ चौकार मारले. ख्रिस वोक्सच्या चेंडूवर तो एलबीडब्ल्यू आऊट झाला. बाबरने रिव्ह्यू घेतला, पण काही फायदा झाला नाही.

तिसऱ्या पंचाने पाहिले तेव्हा बाबर आझम बाद असल्याचे समोर आले. अशाप्रकारे बाबर केवळ बादच झाला नाही तर पाकिस्तानी संघाचा डीआरएसही घालवला. 

दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने पहिल्या डावात ४ गडी गमावून ३२८ धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या दिवशी संघाच्या खात्यात आणखी किती धावा जमा होतात हे पाहायचे आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या