Babar Azam Wiaan Mulder Fight : पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आफ्रिकेने जिंकला. यानंतर दुसरा सामना केपटाऊन येथे खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानला फॉलोऑन खेळावा लागला.
यजमान संघाने पहिल्या डावात रायन रिकेल्टनचे द्विशतक आणि कर्णधार टेंबा बावुमाच्या शतकाच्या जोरावर ६१५ धावांचा डोंगर उभा केला. तिसऱ्या दिवसाच्या खेळात पाकिस्तानचा संपूर्ण संघ पहिल्या डावात अवघ्या १९४ धावांवर गारद झाला. यानंतर पाकिस्तानला फॉलोऑन खेळावा लागला.
फॉलोऑन खेळताना पाकिस्तानने चांगली फलंदाजी केली. हे वृत्त लिहिपर्यंत पाकिस्तानने चौथ्या दिवशी ३ हाद ३०१ धावा केल्या होत्या. पाकिस्तान अजूनही १२० धावांनी पिछाडीवर आहे.
दरम्यान, या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर एक गंभीर घटना घडली. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज वियान मुल्डरच्या थ्रोवर बाबर आझम दुखापत होण्यापासून थोडक्यात वाचला.
केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या न्यूलँड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात बाबर आझमने चांगली फलंदाजी केली. ८१ धावांचा डाव खेळून तिसऱ्या दिवशी तो बाद झाला. या खेळीदरम्यान त्याची दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वियान मुल्डरशी वाद झाला.
वास्तविक, बाबर आझम आणि शान मसूद यांनी २०५ धावांची भागिदारी केली. पहिल्या डावात पाकिस्तानची फलंदाजी खराब झाली आणि त्यांना फॉलोऑन खेळावा लागला. पण दुसऱ्या डावात संघाने जोरदार पुनरागमन केले आणि बाबर आझम आणि शान मसूद यांनी आफ्रिकन गोलंदाजांना त्रस्त करून सोडले.
आफ्रिकन गोलंदाजांना विकेट मिळत नव्हत्या. त्यामुळे गोलंदाजांची चिडचिड होत होती. अशा स्थितीत वियान मुल्डर याने ३२ व्या षटकात बाबरच्या अंगावर थ्रो मारला.
या षटकातील चौथा चेंडू बाबरने डिफेन्स केला, तो गोलंदाज मुल्दर याच्या हातात गेला. चेंडूत हातात येताच त्याने तो स्टंपच्या दिशेने फेकला, पण चेंडू स्टंपवर न जाता बाबरला लागला. यानंतर बाबर आणि मुल्दर यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर पंचांनी आणि एडन मार्करम यांनी मध्यस्थी करत प्रकरण मिटवले.
संबंधित बातम्या