मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Babar Azam Video : बांगलादेशी खेळाडू बाबर आझमला भिडला, पंचांनी मिटवलं भांडण

Babar Azam Video : बांगलादेशी खेळाडू बाबर आझमला भिडला, पंचांनी मिटवलं भांडण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 28, 2024 11:47 AM IST

Babar Azam Viral Video : बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये एक बांगलादेशी खेळाडू बाबर आझमला भिडला होता. यानंतर बाबरझाचाही संयम सुटला आणि परिस्थिती बिघडली.

Babar Azam Viral Video
Babar Azam Viral Video

Babar Azam Viral Video : बांगलादेशात सध्या त्यांची क्रिकेट लीग बांगलादेश प्रीमियर लीगचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत क्रिकेट जगतातील अनेक स्टार खेळाडू सहभागी झाले आहेत. BPL मध्ये पाकिस्तानचा सुपरस्टार बाबर आझमदेखील खेळताना दिसत आहे.

पण अशातच, बाबर आझमचा एक व्हिडीओ सोशल मीडियवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बाबर आझम वाद घालताना दिसत आहे.

बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये एक बांगलादेशी खेळाडू बाबर आझमला भिडला होता. यानंतर बाबरझाचाही संयम सुटला आणि परिस्थिती बिघडली. यानंतर मैदानावरील पंचांना हस्तक्षेप करावा लागला. आता बाबरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

बांगलादेश प्रीमियर लीगच्या १२व्या सामन्यात रंगपूर रायडर्स आणि दुर्दंतो ढाका हे संघ आमनेसामने होते. रंगपूरसाठी बाबर आझम सलामीला आला होता. यानंतर ढाका संघाच्या अराफतने १३व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बाबर आझमच्या संघाचा खेळाडू नुरुल हसनची विकेट घेतली. यानंतर ढाक्याचा यष्टिरक्षक इरफान सुकूरने बाबर आझमला स्लेज केले. बाबरने त्याला प्रत्युत्तर दिले, अशात दोन्ही खेळाडू समोरासमोर आले. त्यानंतर पंचांनी हस्तक्षेप करत प्रकरण शांत केले.

बाबर आझमने शानदार खेळी केली

दरम्यान, या सामन्यात बाबर आझमने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. बाबरने ४६ चेंडूत ६२ धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. बाबर आझमच्या संघाने २० षटकांत ८ बाद १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात ढाका संघ १६.३ षटकांत १०४ धावांवर गारद झाला. अशाप्रकारे रंगपूर रायडर्सने ७९ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.

WhatsApp channel