Babar Azam : बाबर आझमची हकालपट्टी! इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Babar Azam : बाबर आझमची हकालपट्टी! इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर

Babar Azam : बाबर आझमची हकालपट्टी! इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर

Published Oct 13, 2024 05:05 PM IST

Pakistan vs England : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी पाकिस्तान संघ घोषित करण्यात आला आहे. स्टार फलंदाज बाबर आझम याला या संघातून वगळण्यात आले आहे. बाबर कसोटीत सतत फ्लॉप होत होता.

Babar Azam : बाबर आझमची हकालपट्टी! इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर
Babar Azam : बाबर आझमची हकालपट्टी! इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर (AP)

Babar Azam PAK vs ENG 2nd Test : बाबर आझम सध्या त्याच्या करिअरच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. अलीकडेच बाबरला खराब फॉर्ममुळे कर्णधारपद गमवावे लागले होते. तो पाकिस्तानचा व्हाइट बॉल संघाचा कर्णधार होता, पण खराब फॉर्ममुळे त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता कर्णधारपदानंतर बाबरची संघातूनही हकालपट्टी झाली आहे.

वास्तविक, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानी संघाची घोषणा केली आहे. या संघातून नसीम शाह, शाहीन आफ्रिदी आणि बाबर यांना वगळण्यात आले आहे.

फॉर्मशी झगडत असलेला अनुभवी फलंदाज बाबर आझमला पाकिस्तान कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. या फॉरमॅटमध्ये बाबरची बॅट गेल्या काही काळापासून शांत राहिली आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत फ्लॉप ठरल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही तो अपयशी ठरला. आता बाबरला दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात स्थान मिळालेले नाही. बाबरसोबतच शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांनाही वगळण्यात आले आहे.

इंग्लंडविरुद्ध मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत बाबरने पहिल्या डावात ३० आणि दुसऱ्या डावात ०५ धावा केल्या होत्या.

बाबर २०२३ मध्ये सुपर फ्लॉप

बाबर आझमची बॅट २०२३  पासून कसोटीत पूर्णपणे शांत आहे. गेल्या २२ महिन्यांत त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. जानेवारी २०२३ पासून आत्तापर्यंत बाबर आझम ९ कसोटी सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. या कालावधीत त्याच्या बॅटमधून २०.७ च्या सरासरीने ३५२ धावा झाल्या आहेत.

त्याची सर्वात मोठी खेळी ४१ धावांची होती. यातील पाकिस्तानने घरच्या मैदानावर ४ कसोटी सामने खेळले आहेत. गतवर्षी विश्वचषकानंतर बाबरने या फॉरमॅटमधील कर्णधारपदही सोडले होते.

दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान संघ: शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसिबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), नोमान अली, सैम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा, जाहिद महमूद.

बाबरची आत्तापर्यंतची कसोटी कारकीर्द

बाबर आझम याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५५ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या १०० डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने ४३.९२ च्या सरासरीने ३९९७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ९ शतके आणि २६ अर्धशतके केली आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या