Babar Azam : दोन कोटींची गाडी आली कुठून? बाबर आझमवर फसवणुकीचा आरोप! वरिष्ठ पत्रकाराचा व्हिडीओ पाहा-babar azam brother gifted audi e tron priced 2 crore serious allegations by pakistani journalist video viral ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Babar Azam : दोन कोटींची गाडी आली कुठून? बाबर आझमवर फसवणुकीचा आरोप! वरिष्ठ पत्रकाराचा व्हिडीओ पाहा

Babar Azam : दोन कोटींची गाडी आली कुठून? बाबर आझमवर फसवणुकीचा आरोप! वरिष्ठ पत्रकाराचा व्हिडीओ पाहा

Jun 21, 2024 12:14 PM IST

Babar Azam : बाबर आझम याला भेट म्हणून मिळालेली ऑडी कंपनीची कार सध्या चर्चेत आली आहे. भारतात त्याची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे आणि पाकिस्तानमध्ये त्याची सर्वाधिक किंमत ८ कोटी रुपये आहे. पण संघ हरल्यानंतर कार कोण गिफ्ट देतं, असा प्रश्न विचारला जात आहे.

Babar Azam : दोन कोटींची गाडी आली कुठून? बाबर आझमवर फसवणुकीचा आरोप! वरिष्ठ पत्रकारानं सगळंच सांगितलं
Babar Azam : दोन कोटींची गाडी आली कुठून? बाबर आझमवर फसवणुकीचा आरोप! वरिष्ठ पत्रकारानं सगळंच सांगितलं (AP)

babar azam t20 world cup 2024टी-20 विश्वचषकातून पाकिस्तान बाहेर पडल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि त्याच्या संघावर जोरदार टीका होत आहे. गेल्या विश्वचषकात उपविजेता ठरलेल्या पाकिस्तानी संघाला यावेळी सुपर-८ मध्येही स्थान मिळवता आले नाही. पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनीही संघात एकजूट नसल्याची कबुली दिली आहे.

आता एका ज्येष्ठ पत्रकाराने बाबर आझमवर गंभीर आरोप केले असून त्यात बाबर आझम याला महागडी कार गिफ्ट केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

या कारचे नाव ऑडी ई-ट्रॉन जीटी आहे, ज्याची भारतात किंमत २ कोटी रुपयांपर्यंत आहे. तर पाकिस्तानमध्ये त्याची सर्वाधिक किंमत ८ कोटी रुपये आहे. बाबरच्या भावाने ही कार त्याला भेट दिली होती, असे सांगण्यात आले.

व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार मुबशीर लुकमान हे बोलताना दिसत आहेत, "बाबर आझम याला नवीन ऑडी ई-ट्रॉन मिळाली आहे.

बाबर आझमने सांगितले होते, की ही कार त्याला त्याच्या भावाने भेट म्हणून दिली आहे. मला जाणून घ्यायचे आहे की त्याचा भाऊ काय काम करतो, जो ७-८ कोटींची कार गिफ्ट करतो आहे. माझ्या माहितीनुसार बाबरचा भाऊ काहीच करत नाही.

तसेच, मला कोणीतरी सांगितले की, तुम्ही जर छोट्या संघांकडून हरलात तर तुम्हाला प्लॉट किंवा गाडी मिळत नाही. मग हे सर्व कोणाकडून मिळत आहे? मी त्या व्यक्तीला सांगितले की हे खूप गंभीर आरोप आहेत. तो म्हणाला सगळ्यांना माहीत आहे कोणाला कोणाककडून काय मिळतंय?

पाकिस्तान संघ आता काय करणार?

पाकिस्तान संघ २०२४ च्या टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला असून पाकिस्तान संघ पुढील दोन महिने कोणतेही क्रिकेट खेळणार नाही. त्यांची पुढची मालिका ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्या मालिकेत बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांना विश्रांती देण्यात येणार असल्याची बातमी आहे. याशिवाय पाकिस्तान पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आयोजनही करणार आहे. संघाच्या भवितव्याबाबत मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि गोलंदाजी प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांचाही सल्ला घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Whats_app_banner