Babar Azam New Bat Sponsorship Deal : बाबर आझम याने अलीकडेच पाकिस्तानच्या स्पोर्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी 'सीए स्पोर्ट्स'शी करार केला आहे. या कंपनीच्या बॅटने बाबरने त्याचा फॉर्म परत मिळवला आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही कंपनी पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला मोठी रक्कम देत आहे. या करारांतर्गत त्याला वार्षिक ७ कोटी रुपये मिळतील आणि त्याच्या कामगिरीच्या आधारे बोनसही देणार आहे.
दरम्यान, काही काळापूर्वी, बाबर एका अर्धशतकासाठी धडपडत होता. पण आता दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी केली. बबारने चांगली कामगिरी केली, पण पाकिस्तानचा या मालिकेत २-० ने पराभव झाला. बाबरने नव्या बॅटने फलंदाजी करताना कसोटी मालिकेतील ४ डावांत ४८ पेक्षा जास्त सरासरीने १९३ धावा केल्या. या मालिकेत त्याने ३ अर्धशतकांच्या खेळी खेळल्या होत्या.
याशिवाय आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने ३ सामन्यांत ४९ पेक्षा जास्त सरासरीने १४८ धावा केल्या. एकदिवसीय मालिकेत त्याने २ अर्धशतकांची खेळीही खेळली.
याआधी बाबर आझम इंग्लंडच्या 'ग्रे निकल्स' कंपनीच्या बॅटने खेळायचा, पण आता पाकिस्तानी कंपनी 'सीए स्पोर्ट्स' त्याला वर्षाला ७ कोटी रुपये मानधन देत आहे.
विशेष म्हणजे, बाबरने हा करार केल्यानंतर काही वेळातच त्याच्या ऑटोग्राफ असलेल्या CA कंपनीच्या बॅटचा स्टॉक काही वेळातच संपला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबरने या कंपनीच्या बॅटने अर्धशतक आणि शतक झळकावल्यानंतर त्याला बोनस मिळणार आहे. विराट कोहली आणि जो रुट यांचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असाच करार आहे. पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा करार आहे.
विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर त्याला भारतीय टायर उत्पादक कंपनी 'MRF' ने स्पॉन्सर केले आहे. ही कंपनी विराटला वर्षाला १२.५ कोटी रुपये देते. तर इंग्लंड संघाचा माजी कर्णधार जो रूट याला 'न्यू बॅलन्स' नावाची कंपनी स्पॉन्सर करते, जी त्याला वार्षिक १.८ कोटी रुपये मानधन देते. प्रायोजकत्वाच्या माध्यमातून मोठी कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता बाबर आझमचे नावही जोडले गेले आहे.
संबंधित बातम्या