ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार गोलंदाज नॅथन ब्रॅकन सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. ब्रॅकनने ऑस्ट्रेलियाला दोन वर्ल्डकप जिंकून दिले आहेत. पण तोच ब्रॅकन सध्या एका खासगी कंपनीत काम करतो आहे. हेडन, गिलख्रिस्ट, पॉंटिंग, ब्रेटलीसारखे त्याच्या सोबतचे सर्व क्रिकेटर अलीशान आयुष्य जगत आहेत. पण ब्रॅकनला शिफ्टमध्ये काम करावे लागते आहे.
खरं तर नॅथन ब्रॅकन जेव्हा क्रिकेटमध्ये सक्रिय होता, तेव्हा सर्वकाही चांगल होते. ब्रॅकनने त्याच्या काळात वीरेंद्र सेहवागसारख्या फलंदाजांना अनेकदा बाद केले. पण त्याने आयुष्यात एक मोठी चुक केली. ती म्हणजे त्याने जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आयपीएल खेळण्यास नकार दिला.
यामुळे आता नॅथन ब्रॅकन याला एका कंपनीत शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. तो अकाउंट मॅनेजर आहे.
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज नॅथन ब्रॅकन अचूक गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याने आपल्या कारकिर्दीत भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागसह अनेक मोठ्या फलंदाजांना अनेकदा अडचणीत आणले. एकीकडे ब्रॅकनने सेहवागला अनेकवेळा बाद केले, तर दुसरीकडे आयपीएलसारख्या मोठ्या लीगमधून मिळालेला मोठा करारही त्याने नाकारला.
वेगवान स्विंग गोलंदाजाने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण २०० हून अधिक बळी घेतले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ११६ सामन्यात १७४ विकेट घेतल्या. तो २००३ आणि २००७ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता.
नॅथन ब्रॅकनने वीरेंद्र सेहवागला वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये एकूण १६ डावांमध्ये ७ वेळा बाद केले होते. ब्रॅकनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द गुडघ्याच्या दुखापतीमुळे लवकर संपली. त्याने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
गुडघ्याच्या समस्येमुळे त्याने २०११ मध्ये वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ब्रॅकन यांची अचानक निवृत्ती त्यांच्या चाहत्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी नव्हती.
या काळात, इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून उदयास येत होती. २०११ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (RCB) ब्रॅकनला १.३ कोटी रुपयांचा मोठा करार दिला होता, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ब्रॅकनने ही ऑफर नाकारली. त्याने टी-२० क्रिकेटमधील व्यस्त वेळापत्रक हे त्याच्या निर्णयामागचे कारण सांगितले होते. यामागे दुखापतीही कारणीभूत असण्याची शक्यता आहे.
आयपीएलसारख्या लीगमधून मोठा करार नाकारणे हा सोपा निर्णय नाही, परंतु ब्रॅकनचा असा विश्वास होता की त्याच्या दुखापतीमुळे तो जास्त क्रिकेट खेळू शकत नाही. ब्रॅकनच्या या निर्णयावरून हे दिसून येते की त्याने पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा त्याच्या आरोग्याला अधिक महत्त्व दिले.
त्याला आपली क्रिकेट कारकीर्द लांबवायची होती, परंतु गुडघ्यांनी त्याला साथ दिली नाही. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर ब्रॅकनने वेगळा मार्ग निवडला.
नॅथन ब्रॅकन त्याच्या लाईन लेंथ आणि अचूक टप्प्यासाठी ओळखला जायचा. पण नॅथन ब्रॅकन ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील एका कंपनीत अकाउंट मॅनेजर म्हणून काम करत आहे.