Virat Kohli Clown Controversy : विराट कोहलीला टार्गेट करणे ही ऑस्ट्रेलियन मीडियाची जुनी सवय आहे. पण यावेळी त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ऑस्ट्रेलियन मीडियाने कोहलीला जोकर म्हटले आहे.
बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी नवोदित सॅम कॉन्स्टास आणि कोहली यांच्यात बाचाबाची झाली. कोहलीने कॉन्स्टासला खांद्याने धक्का दिला होता, त्यानंतर आयसीसीने त्याला शिक्षा केली. किंग कोहलीला त्याच्या मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावला आहे. सोबतच त्याला एक डिमेरिट पॉइंट देखील मिळाला.
पण त्याला ही शिक्षा दिल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचे समाधान झाले नाही आणि त्यांनी आयसीसीवर पक्षपाताचा आरोप केला. बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांमध्ये हा मुद्दा पूर्णपणे प्रसिद्ध झाला. कोहलीवर वृत्तपत्रांतून जोरदार टीका झाली. ऑस्ट्रेलियन मीडियाने कोहलीसाठी विदूषक हा शब्द वापरला.
खरंतर, विराट कोहलीला ऑस्ट्रेलियन मीडियाने जोकर म्हटले आहे. शुक्रवारी वेस्ट ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने कोहलीला त्याच्या मागच्या पानावर जोकर म्हणून दाखवले. दुसऱ्या एका वृत्तपत्राने आयसीसीवर पक्षपाताचा आरोप केला. त्यांच्या मते, कोहलीला कमी शिक्षा देण्यात आली. यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने आयसीसी आणि कोहलीवर बरीच टीका केली.
दरम्यान, हा सगळा प्रकार एक दिवस आधी म्हणजे बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्या दिवशी सुरू झाली, जेव्हा कोहलीने १९ वर्षीय सलामीवीर सॅम कॉन्स्टासला धक्का दिला आणि यादरम्यान दोघांमध्ये वाद झाला. आयसीसीने कोहलीच्या मॅच फीमध्ये २० टक्के कपात आणि एक डिमेरिट पॉइंट दिला होता.
स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचन करताना, माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने ऑस्ट्रेलियन मीडियाने कोहलीची खिल्ली उडवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. इरफान म्हणाला की, विराट कोहलीसारख्या दिग्गज क्रिकेटपटूला जोकर म्हणणे योग्य नाही. रेफरीने जी शिक्षा द्यावी लागते ती दिली, पण तुम्ही किंगला पूर्ण जोकर म्हणत आहात, आम्ही हे मान्य करणार नाही. तुम्हाला तुमचा पेपर विकायचा आहे, यासाठी तुम्ही कोहलीचा खांदा वापरत आहात.
मार्केटमध्ये त्याची किंमत काय आहे हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत कोहलीच्या मार्केट व्हॅल्युचा फायदा घेऊन तुम्ही तुमची पब्लिसीटी करत आहात.
संबंधित बातम्या