मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Video : खेळाडूंनी अपील केलं नाही म्हणून पंचांनी बाद दिलं नाही, ऑस्ट्रेलियासोबत घडला विचित्र प्रसंग

Video : खेळाडूंनी अपील केलं नाही म्हणून पंचांनी बाद दिलं नाही, ऑस्ट्रेलियासोबत घडला विचित्र प्रसंग

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 11, 2024 08:31 PM IST

AUS vs WI T20 : सामन्यातील दुसऱ्या डावात एक विचित्र प्रसंग घडला. फलंदाज बाद असतानाही पंचांनी त्याला नाबाद ठरवले. यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू चांगलेच नाराज झाले. तसेच, चाहतेही घडलेला प्रसंग पाहून आश्चर्यचकित झाले होते.

Australia vs West Indies, 2nd T20I
Australia vs West Indies, 2nd T20I

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (११ फेब्रुवारी) अॅडलेड येथे खेळला गेला. या सामन्या ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा ३४ धावांनी पराभव केला.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकात २४१ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून ग्लेन मॅक्सवेलने ५५ चेंडूत १२० धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ २०७ धावाच करू शकला.

मात्र, या सामन्यातील दुसऱ्या डावात एक विचित्र प्रसंग घडला. फलंदाज बाद असतानाही पंचांनी त्याला नाबाद ठरवले. यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू चांगलेच नाराज झाले. तसेच, चाहतेही घडलेला प्रसंग पाहून आश्चर्यचकित झाले होते.

वास्तविक, वेस्ट इंडिजच्या डावातील १९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अल्झारी जोसेफ फलंदाजी करत होता. तर स्पेन्सर जॉन्सन बॉलिंग करत होता. त्यावेळी अल्झारीने कव्हरच्या दिशेने एक शॉट खेळला. तेव्हा टीम डेव्हिडने तो पकडला आणि चेंडू स्पेन्सर जॉन्सनकडे फेकला. जॉन्सनने कोणतीही चूक न करता बेल्स उडवून दिल्या. अल्झारी जोसेफ क्रीजच्या बाहेर होता.

पण इथे ऑस्ट्रेलियन संघाची एक चूक झाली. त्यांनी बेल्स उडवल्यानंतर धावबादचे अपील केले नाही. कारण अल्झारी धावबाद असल्याचे सर्वांनाच दिसत होते. त्यामुळे त्यांनी अपील करणे, गरजेचे समजले नाही.

पण पंचांनी अल्झारी जोसेफेला बाद दिले नाही. पंचांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सांगितले की, तुम्ही बादचे अपील केले नाही, त्यामुळे जोसेफ बाद ठरणार नाही. जोसेफदेखील क्रीजवरच थांबून होता.

अंपायरकडून हे कारण ऐकल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श अवाक झाला. ऑस्ट्रेलियन खेळाडू लगेच जमले आणि त्यांनी अंपायरशी वाद घालायला सुरुवात केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि अल्झारी नाबाद राहिला.

पण, या सामन्याच्या निकालावर अंपायरच्या या निर्णयाचा काहीच परिणाम झाला नाही. कारण १९व्या षटकात हा प्रसंग घडला होता आणि ऑस्ट्रेलियाचा विजय त्याआधीच निश्चित झाला होता.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi