ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे खेळाडू सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची लाय डिटेक्टर टेस्ट करण्यात आली आहे. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल मार्श यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंना लाय-डिटेक्टर टेस्टदरम्यान वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले.
वास्तविक, ही लाय डिटेक्टर टेस्ट ऑस्ट्रेलियन टीव्ही चॅनलद्वारे आयोजित 'फ्लेच अँण्ड हिंडी' (Fletch and Hindy) शोमध्ये घेण्यात आली. या टेस्टमध्ये बरोबर उत्तर दिल्यास निळ्या बटणाच्या वरची लाईट लागते, पण चुकीचे उत्तर दिल्यास खेळाडूंना विजेचा झटका लागतो.
पहिल्या फेरीचे प्रश्न अतिशय सोपे होते, या फेरीत खेळाडूंना त्यांची नावे विचारण्यात आली. दरम्यान, कांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला विचारण्यात आले की, 'बझबॉल'मध्ये अतिशयोक्ती झाली आहे का? यावर कमिन्सने सरळ सांगितले की 'बझबॉल' खरोखरच मूर्खपणा आहे.
यानंतर ट्रॅव्हिस हेडला प्रश्न विचारण्यात आला. त्याला विचारण्यात आले की, २०२३ च्या वर्ल्डकप फायनलनंतर हेडने प्रचंड दारू प्यायली होती. यावर ट्रॅव्हिस हेडने 'हो' असे उत्तर दिले.
जेव्हा ट्रॅव्हिस हेडला विचारण्यात आले की त्याने फायनलनंतर ५ पेक्षा जास्त बिअर प्यायल्या, तेव्हा त्याने 'नाही' असे उत्तर दिले. पण जेव्हा लाय डिटेक्टर मशीनने खोटे पकडले, तेव्हा त्याला विजेचा धक्का बसला.
दुसरीकडे, डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियन संघातील वातावरण चांगले आहे का, असा प्रश्न उस्मान ख्वाजा याला विचारण्यात आला. यावर ख्वाजाने 'नाही' असे उत्तर दिले. पण मशीनने ख्वाजा याला विजेचा जोरदार धक्का दिला.
ग्लेन मॅक्सवेल याला या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणाऱ्या संघातून रहस्यमयरीत्या वगळण्यात आल्याच्या घटनेबाबत मार्नस लॅबुशेनला प्रश्न विचारण्यात आला.
वास्तविक, मॅक्सवेलने एका पबमध्ये खूप दारू प्यायली होती, पण गोल्फ कार्टवर पडल्याचे कारण देऊन मॅक्सवेलला वादातून वाचवले. मॅक्सवेल गोल्फ कार्टवर पडल्याचे कारण देत काही लपविण्याचा प्रयत्न झाला का? असा प्रश्न लॅबुशेनला विचारण्यात आला, तेव्हा त्याने 'नाही' असे उत्तर दिले. यानंतर त्याला विजेचा धक्का बसला.