Ind w vs Aus w : ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानंही भारताला धुतलं, वनडेत ठोकल्या ३७१ धावा, एलिस पेरीचं वादळी शतक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind w vs Aus w : ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानंही भारताला धुतलं, वनडेत ठोकल्या ३७१ धावा, एलिस पेरीचं वादळी शतक

Ind w vs Aus w : ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानंही भारताला धुतलं, वनडेत ठोकल्या ३७१ धावा, एलिस पेरीचं वादळी शतक

Dec 08, 2024 09:39 AM IST

Ind w vs Aus w Scorecard : ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारतीय संघाची धुलाई करत ३७१ धावा ठोकल्या. ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानंही भारताला धुतलं, वनडे ठोकल्या ३७१ धावा, एलिस पेरीचं वादळी शतक
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानंही भारताला धुतलं, वनडे ठोकल्या ३७१ धावा, एलिस पेरीचं वादळी शतक (AFP)

भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आज (८ डिसेंबर) ऑस्ट्रेलियन संघाने हरमनप्रीत कौरच्या संघाची तुफान केली आणि ५० षटकात ८ बाद ३७१ धावांचा डोंगर उभारला. भारताला आता विजयासाठी ३७२ धावा करायच्या आहेत.

ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीला आलेली जॉर्जिय वोल आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेली एलिस पेरी यांनी शतके ठोकली. वोलने ८७ चेंडूत १०१ धावा केल्या. तिने १२ चौकार मारले. तर एलिस पेरीने आक्रमक फलंदाजी करताना ७५ चेंडूत १०५ धावा केल्या. तिने ७ चौकार आणि ६ चौकार मारले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीस आलेल्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. फिबी लिचफिल्ड आणि वोल यांनी १९ षटकात १३० धावांची सलामी दिली. लिचफिल्डने ६० धावा केल्या. तर बेथ मुनीने ५६ धावाचे योगदान दिले.

एकवेळ ऑस्ट्रेलिया सहज ४०० धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत होते, पण शेवटी भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया- फोबी लिचफिल्ड, जॉर्जिया वॉल, एलिस पेरी, बेथ मूनी (विकेटकीपर), ॲनाबेल सदरलँड, ॲशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), सोफी मोलिनक्स, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शुट

भारत- प्रिया पुनिया, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, सायमा ठाकोर, रेणुका ठाकूर सिंग

Whats_app_banner

संबंधित बातम्या