ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या स्कॉटलंडच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. एडिनबर्गच्या ग्रँज क्रिकेट क्लबच्या मैदानावर हा सामना खेळला जात आहे. या दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिशने तुफानी खेळी केली. २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने शतक केले.
जोश इंग्लिशने ४९ चेंडूत २१०.२ च्या स्ट्राईक रेटने १०३ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ७ शानदार षटकार मारले. ख्रिस्तोफर सोलेने त्याची विकेट घेतली. जोश इंग्लिशचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे.
त्याच्या शतकाच्या जोरावर, जोश इंग्लिसने ॲरॉन फिंचचा एक मोठा विक्रमही मोडला, ज्यामध्ये तो आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे. एडिनबर्गच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लिसने अवघ्या ४३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात ११ धावांवर ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने पहिली विकेट गमावली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिसने वेगवान फलंदाजी केली. यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या ६ षटकांत ५५ धावांपर्यंत मजल मारली.
इंग्लिशला ख्रिस ग्रीनची साथ लाभली आणि दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी ५२ चेंडूत ९२ धावांची भागीदारी केली आणि संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. ग्रीन बाद झाल्यानंतर इंग्लिशने मार्कस स्टॉइनिससह चौथ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ६४ धावांची भागीदारी केली आणि धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली. इंग्लिशने ४९ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार आणि ७ षटकारांसह १०३ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.
जोश इंग्लिसचे हे T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे शतक आहे आणि याआधी त्याने फलंदाज म्हणून खेळताना पहिले शतक झळकावले होते, तर या सामन्यात तो यष्टीरक्षक-फलंदाजाची भूमिका बजावत आहे. यासह जोश इंग्लिस आता आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये शतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे.