ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात पर्थमध्ये आज (१० नोव्हेंबर) तिसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज धुमाकूळ घालत आहेत. ऑस्ट्रेलियन फलंदाज नसीम शाह आणि हरिस रौफसमोर फ्लॉप ठरत आहेत.
तीन सामन्यांची ही मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघ मालिका जिंकण्याच्या मार्गावर आहे.
वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाने केवळ ८८ धावांवर ६ विकेट गमावल्या होत्या. एका फलंदाजाला दुखापत झाली आहे. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद हसनैन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत हा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला जॅक फ्रेझर मॅकगर्क फ्लॉप ठरला. त्याला नसीम शाहने बाद केले. एका चौकाराच्या जोरावर त्याला ९ चेंडूत केवळ ७ धावा करता आल्या.
यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेला ॲरॉन हार्डीही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. हार्दिकला शाहीन आफ्रिदीने बाद केले. तो १३ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ३६ धावांत २ गडी बाद झाल्यानंतर कांगारूंना कर्णधार जोश इंग्लिसकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्याने पुन्हा एकदा निराशा केली.
जोश इंग्लिश १९ चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने ७ धावा करून बाद झाला. नसीम शाहने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर हारिस रौफने सेट झालेल्या मॅथ्यू शॉर्टला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ३० चेंडूत २२ धावा करून तो बाद झाला.
टॉप ऑर्डर पूर्ण फ्लॉप झाल्यानंतर शेवटची आशा मार्कस स्टॉइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडून होती. पण हे दोन दिग्गजही पाकिस्तानी गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. २५ चेंडूत ८ धावा करून स्टॉइनिस बाद झाला तेव्हा मॅक्सवेल शुन्यावर बाद झाला.
ऑस्ट्रेलिया- मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, जोश इंग्लिस (कर्णधार आणि विकेटकीपर), कूपर कोनोली, मार्कस स्टॉइनिस, ॲरॉन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, सीन ॲबॉट, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, लान्स मॉरिस
पाकिस्तान- सायम अय्युब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि विकेटकीपर), कामरान गुलाम, आगा सलमान, इरफान खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन खेळत आहेत