पाकिस्तान संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघांमध्ये कसोटी वनडे मालिकेनंतर टी-20 मालिका खेळली जात आहे. पाकिस्तानी संघाने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. पण तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत त्यांची सुरुवात अतिशय लाजिरवाणी झाली.
या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या गब्बा मैदानावर खेळला गेला. या सामन्यात पावसाचा अडथळा आला. पावसामुळे ७-७ षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ षटकांत ४ गडी गमावून ९३ धावा केल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघ ७ षटकात ९ गडी गमावून केवळ ६४ धावाच करू शकला आणि त्यांना या सामन्यात २९ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
मोहम्मद रिझवानला पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वाखालील संघासाठी पहिला T20 सामना काही खास नव्हता. या सामन्यात पाकिस्तानी संघ ९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आला तेव्हा त्यांनी अवघ्या १६ धावात ५ विकेट गमावल्या होत्या.
यात कर्णधार आणि सलामीवीर मोहम्मद रिझवान शुन्यावर बाद झााल. यानंतर संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू बाबर आझमही अवघ्या तीन धावा करून तंबूत परतला. त्यांच्या डाव शेवटपर्यंत सावरू शकला नाही.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर झेवियर बार्टलेट आणि नॅथन एलिस यांची कामगिरी पाहायला मिळाली ज्यात दोघांनी ३-३ विकेट्स घेतल्या. याशिवाय ॲडम झाम्पाने २तर स्पेन्सर जॉन्सनलाही एक विकेट घेण्यात यश आले. या सामन्यात कांगारू संघाकडून फलंदाजी करताना मॅक्सवेलने १९ चेंडूत ४३ धावा केल्या तर स्टॉइनिसने नाबाद २१ धावा केल्या. आता या मालिकेतील दुसरा सामना १६ नोव्हेंबरला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे.