IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीने ११० चेंडू खेळून काढले, मेलबर्न कसोटी रोमहर्षक स्थितीत
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीने ११० चेंडू खेळून काढले, मेलबर्न कसोटी रोमहर्षक स्थितीत

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीने ११० चेंडू खेळून काढले, मेलबर्न कसोटी रोमहर्षक स्थितीत

Dec 29, 2024 01:27 PM IST

IND vs AUS Day 4 Highlights : मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ३३३ धावांची आघाडी घेतली आहे. आता या सामन्याचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीने ११० चेंडू खेळून काढले, सामन्याचा निकाल आता शेवटच्या लागणार
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीने ११० चेंडू खेळून काढले, सामन्याचा निकाल आता शेवटच्या लागणार (AP)

IND vs AUS 4th Test Day 4 Highlights : बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला ऑलआउट करू शकला नाही. ९१ धावांत ६ विकेट पडल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर ९ विकेटवर २२८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीने आतापर्यंत ११० चेंडूं खेळून काढले. दहाव्या क्रमांकावरील नॅथन लायन ४१ आणि आकराव्या क्रमांकावर आलेल्या स्कॉट बोलंड १० धावांवर नाबाद आहेत. दोघांमध्ये ५५ धावांची भागीदारी झाली आहे.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४७४ धावा केल्या होत्या आणि भारताने ३६९ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी ३३३ धावांची झाली आहे.

९१ धावांवर ६ विकेट पडल्या

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर सॅम कॉन्स्टास अवघ्या ८ धावा करून जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. उस्मान ख्वाजा (२१)ही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. स्टीव्ह स्मिथ आणि लॅबुशेन यांच्यात ३७ धावांची भागीदारी झाली.

ऑस्ट्रेलियाची धावसंख्या दोन विकेट्स ८० अशी होती. यानंतर बुमराहने धारदार गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन संघाने ११ धावा करताना ४ विकेट गमावल्या. स्मिथला सिराजने बाद केले. यानंतर बुमराहने त्याच षटकात हेड (१) आणि मार्श (०) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॅरीही २ धावा करून बुमराहच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला.

यशस्वी जैस्वालने झेल सोडले

यशस्वी जैस्वालने मार्नस लॅबुशेनचा सोपा झेल सोडला. यामुळे त्याने कमिन्सच्या साथीने डाव सांभाळला. यादरम्यान लॅबुशेननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघांमध्ये ५७ धावांची भागीदारी झाली. सिराजने लॅबुशेनची (७०) विकेट घेतली. मिचेल स्टार्कही ५ धावा करून लगेचच धावबाद झाला. कमिन्स (४१) रवींद्र जडेजाने १७३ धावांवर बाद झाला.

१७३ धावांत ९ गडी बाद झाल्यानंतर नॅथन लायन आणि स्कॉट बोलंड यांनी झुंजार फलंदाजी केली. आतापर्यंत शेवटच्या जोडीने १७.४ षटके खेळली आहेत. पहिल्या डावातही दोघांनी ८.३ षटके फलंदाजी केली होती. मात्र, त्यावेळी त्यांना केवळ १९ धावाच जोडता आल्या. त्यांच्या या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने ३०० हून अधिक आघाडी घेतली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या