मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup 2024 : स्टीव्ह स्मिथला नारळ, तर मिचेल मार्श कर्णधार, टी-20 वर्ल्डकपसाठी असा आहे ऑस्ट्रेलियन संघ

T20 World Cup 2024 : स्टीव्ह स्मिथला नारळ, तर मिचेल मार्श कर्णधार, टी-20 वर्ल्डकपसाठी असा आहे ऑस्ट्रेलियन संघ

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 01, 2024 01:57 PM IST

Australia Squad For T20 World Cup 2024 : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी-20 वर्ल्डकपसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ऑलराउंडर मिचेल मार्शकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

T20 World Cup 2024 : स्टीव्ह स्मिथला नारळ, तर मिचेल मार्श कर्णधार, टी-20 वर्ल्डकपसाठी असा आहे ऑस्ट्रेलियन संघ
T20 World Cup 2024 : स्टीव्ह स्मिथला नारळ, तर मिचेल मार्श कर्णधार, टी-20 वर्ल्डकपसाठी असा आहे ऑस्ट्रेलियन संघ (PTI)

Australia Squad For T20 World Cup 2024 : आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाने बुधवारी (१ मे) १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ऑलराउंडर मिचेल मार्शकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. तर अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि आयपीएल गाजवणारा युवा सलामीवीर जॅक फ्रेझर मॅकगर्क यांना वगळण्यात आले आहे. तसेच, अनुभवी वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ आणि अष्टपैलू मॅथ्यू शॉर्ट यांनाही संघात स्थान मिळू शकले नाही.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, २०२१ च्या टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा ऑलराउंडर ॲश्टन अगरची ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप संघात एन्ट्री झाली आहे. डावखुरा फिरकीपटू २०२२ च्या T20 विश्वचषकानंतर एकही T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. याशिवाय मार्कस स्टॉइनिस आणि कॅमेरून ग्रीन या अष्टपैलू खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे.

ट्रॅव्हिस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल या स्टार खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार पॅट कमिन्सलाही संघाचा भाग बनवण्यात आले आहे. पॅट कमिन्स सध्या आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करत आहेत.

ऑस्ट्रेलियाने बहुतांश अनुभवी खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आहे. आयपीएल २०२४ मध्ये स्फोटक खेळी खेळणाऱ्या जॅक फ्रेझर मॅकगर्कला ऑस्ट्रेलियाने संघाचा भाग बनवले नाही. मॅकगर्क याच्या नावाची बरीच चर्चा सुरू आहे. केंद्रीय कराराचा भाग नसलेल्या मार्कस स्टॉइनिसला ऑस्ट्रेलियाने संधी दिली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाला टी-20 विश्वचषकात ब गटात ठेवण्यात आले आहे. त्यांचा पहिला सामना ५ जून रोजी बार्बाडोस येथे ओमानविरुद्ध होणरा आहे. ऑस्ट्रेलिया आणि ओमान व्यतिरिक्त ब गटात इंग्लंड, नामिबिया आणि स्कॉटलंडचाही समावेश आहे.

T20 विश्वचषक २०२४ साठी ऑस्ट्रेलियाचा संघ

ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर आणि ॲडम झम्पा.

IPL_Entry_Point